Singham Again : आता माझी सटकली...अजय देवगण पुन्हा 'सिंघम'च्या भूमिकेत; 'सिंघम अगेन' कधी होणार रिलीज? जाणून घ्या...
Ajay Devgn : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सिंघमच्या भूमिकेत झळकण्यासाठी सज्ज आहे.
Ajay Devgn Singham Again Release Date : बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) आणि रोहित शेट्टीची (Rohit Shetty) जोडी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज आहे. अजयच्या लोकप्रिय सिनेमांच्या यादीत 'सिंघम' (Singham) सिनेमाचा समावेश आहे. 'सिंघम' आणि 'रिंघम रिटर्न्स' या सिनेमांच्या माध्यमातून अजयने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीने या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची अर्थात 'सिंघम अगेन'ची (Singham Again) घोषणा केली होती. आता या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे.
'सिंघम अगेन' कधी रिलीज होणार? (Singham Again Release Date)
'सिंघम अगेन' (Singham Again) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता या सिनेमासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. रोहित शेट्टी आणि अजय देवगणचा 'सिंघम अगेन' हा सिनेमा 2024 च्या दिवाळीत सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
रोहित शेट्टी आणि अजय देवगणच्या 'सिंघम' आणि 'सिंघम रिटर्न्स' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे प्रेक्षक आता या सिनेमाच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुढच्या वर्षी दिवाळीत 'सिंघम अगेन' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासाठी सज्ज आहे.
View this post on Instagram
'सिंघम अगेन'च्या शूटिंगला लवकरच होणार सुरुवात (Singham Again Shooting)
'सिंघम अगेन' या बहुचर्चित सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. येत्या जुलै महिन्यात रोहित शेट्टी आणि अजय देवगण 'सिंघम अगेन'च्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचा अंदाज आहे. बाजीराव सिंघमच्या भूमिकेत पुन्हा एकदा अजय देवगणला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अजय देवगणसोबत कोण झळकणार?
रोहित शेट्टी आणि अजय देवगणने आजवर अनेक प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केलं आहे. आता 'सिंघम अगेन'च्या माध्यमातून ते पुन्हा एकत्र काम करणार आहेत. ही त्यांची अकरावी वेळ आहे. 2011 साली आलेल्या 'सिंघम' या सिनेमात अजय देवगण आणि काजल अग्रवालची जोडी पाहायला मिळाली होती. त्यानंतर 2014 साली या सिनेमाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात अजय आणि करीना कपूर झळकले होते. त्यामुळे आता या सिनेमाच्या तिसऱ्या भागात अर्थात 'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगणसोबत कोणती अभिनेत्री झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या