एक्स्प्लोर

Sigham Again: अजय देवगणच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'सिंगम अगेन' येणार प्रेक्षकांच्या भेटीस

आता अजयच्या सिंघम या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे.सिंघम (Singham) आणि सिंघम रिटर्न्स हे चित्रपट हिट ठरल्यानंतर आता सिंघम अगेन (Singham Again) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 

Singham Again: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. लवकरच त्याचा भोला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या अजयच्या दृश्यम-2 (Drishyam 2) या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता अजयच्या सिंघम या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. सिंघम (Singham) आणि सिंघम रिटर्न्स हे चित्रपट हिट ठरल्यानंतर आता सिंघम अगेन (Singham Again) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 

तरण आदर्शनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सिंघम अगेन या चित्रपटाबाबत माहिती दिली. तरण आदर्शनं सोशल मीडियावर सिंघम चित्रपटातील अजयचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'अजय देवगण आणि रोहित शेट्टी हे सिंघम अगेनसाठी पुन्हा एकत्र आले आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात अजय हा भोला चित्रपटातून फ्री झाल्यावर होईल.' सिंघम अगेनची आता अजयचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

2011 मध्ये अजय देवगणचा ‘सिंघम’हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्यानंतर  2014मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘सिंघम रिटर्न्स’ रिलीज झाला. अजयचा ‘सिंघम 2’ देखील सुपरहिट ठरला. आता आठ वर्षानंतर सिंघम अगेन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

अजयचा भोला हा चित्रपट 30 मार्च 2023 रोजी रिलीज होणार आहे. भोला या चित्रपटात अजयसोबतच तब्बू देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 1 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघीडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघीडीच्या नेत्यांचे फोन
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Full PC : प्रतिभा पवारांची गेटवर अडवणूक प्रकरण, जितेंद्र आव्हाड अजितदादांवर कडाडलेSantosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांतRajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोलSolapur Sharad Koli Crime : प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या कोळींविरोधात गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघीडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघीडीच्या नेत्यांचे फोन
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
Embed widget