एक्स्प्लोर
कृषी विभागाच्या चुकीचा शेतकऱ्यांना फटका?
मुंबई : राज्यात तूर खरेदीचं नियोजन फसल्याने सरकार अडचणीत आले आहे. शेतकरी हवालदिल झालाय. मात्र या सर्व प्रकाराला कृषी विभाग कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे.
तुरीचे दुसऱ्या नजर अंदाजानुसार सरासरी 661.42 हेक्टरी किलोग्रॅम उत्पादन वर्तवण्यात आलं होतं. तिसऱ्या नजर अंदाजानुसार हेच उत्पादन 1133.42 हेक्टरी किलोग्रॅम इतके पुढं आलं आहे.
नजर अंदाज प्रत्यक्ष शेतीवर जाऊन करावा लागतो. नजर अंदाज साफ चुकल्याची जबाबदारी कृषी विभाग घेईल का, असा सवाल आता विचारला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या खरीप हंगामाचा आढावा घेणार आहेत. त्यावेळी सरकारी यंत्रणेने सरकारच्याच हातावर दिलेल्या तुरी चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी अधिकारी अडचणीत येऊ शकतात.
संबंधित बातम्या :
तूर खरेदीसाठी सरकारच्या दोन नव्या अटी, शेतकरी संतप्त
शेतकरी हवालदिल, लातुरात तूर जाळली!
सरकारकडून तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना धान्य तारण योजनेचा पर्याय
काहीही करा, पण तूर खरेदी करा, शेतकऱ्याची सरकारला आर्त हाक
तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्याला चक्कर, उपचारासाठी 50 हजार रुपये खर्च
तूर खरेदीवर राज्य सरकार तोंडघशी, लाखो क्विंटल तूर खरेदी विना
नाफेडकडून तूरखरेदी बंद, खरेदी केंद्राबाहेर 5 किमी लांब रांगा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement