एक्स्प्लोर

Despatch Review : मनोज बाजपेयींच्या दमदार अभिनय, पण कथानक गुरफटलेलं; नेमका कसा आहे Despatch?

Despatch Review : मनोज बाजपेयींच्या दमदार अभिनयासाठी तुम्ही हा चित्रपट पाहू शकता, शहाना गोस्वामी आणि अर्चिता अग्रवाल यांनीही या चित्रपटात आपल्या अभिनयानं प्रभावित केलं आहे.

Despatch Review : मनोज बाजपेयींच्या दमदार अभिनयासाठी तुम्ही हा चित्रपट पाहू शकता, शहाना गोस्वामी आणि अर्चिता अग्रवाल यांनीही या चित्रपटात आपल्या अभिनयानं प्रभावित केलं आहे.

आजच्या काळात मनोज बाजपेयींच्या श्रेणीतला गुणी अभिनेता मिळणं खूपच अवघड आहे, जे व्यक्तिरेखा अशा प्रकारे साकारतात की, त्यांना पडद्यावर पाहताना आपणही ते मनोज बाजपेयी आहेत, हे विसरून जातो, इथेही त्यांनी तेच केलं आहे, त्यांनी या चित्रपटात अप्रतिम पद्धतीनं क्राईम रिपोर्टरची भूमिका साकारली आहे. आणि त्यांची साथ दिली आहे ती, शहाना गोस्वामी आणि अर्चिता अग्रवाल यांनी, या स्टार्सचा अप्रतिम अभिनय हेच हा चित्रपट पाहण्याचं कारण आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुम्ही हा चित्रपट ZEE5 वर पाहू शकता.

कथा

Despatch नावाच्या वृत्तपत्रात मनोज बाजपेयी म्हणजेच, जॉय बाग क्राईम रिपोर्टर म्हणून काम करत असतात. त्यांचं पत्नी शहाना गोस्वामी म्हणजेच, श्वेता बागसोबत सारखे खटके उडत असून आता प्रकरण अगदी घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचलं आहे. तसेच, त्याचदरम्यान, जॉय बागचं अर्चिता अग्रवाल म्हणजेच प्रेरणा प्रकाश हिच्याशी सूत जुळतं आणि दोघांचं अफेअर सुरू असतं. क्राईम रिपोर्टर म्हणून जॉय बाग एका अंडरवर्ल्डच्या बातमीवर काम करत अलतो, पण तेवढ्यात 2जी घोटाळ्याचे अपडेट्स मिळतात. मग काय होतं? ही एक बातमी कशी जॉय बगाच्या आयुष्यात वादळ घेऊन येते, हेच या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. 

कसा आहे चित्रपट? 

हा चित्रपट फक्त आणि फक्त चित्रपटातील स्टार कास्टच्या अभिनयासाठी पाहता येऊ शकते. दिग्दर्शकांना चित्रपटाच्या कथेला अजिबातच नीट विणता आलेलं नाही, कुठेही काहीही घडतंय, पटकथा खूपच कमकुवत, हो मीडियाच्या कामाची पद्धत दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, पण अनेक ठिकाणी हा चित्रपट जग्गा जासूस झाल्याचं पाहायला मिळतंय, या चित्रपटाला जर आणखी चांगल्या पद्धतीनं लिहिता आलं असतं, तर चित्रपट अप्रतिम झाला असता, मनोज सारख्या दिग्गजाचा अप्रतिम अभिनय वाया गेला आहे, कथेचा शेवट समजतंच नाही, चित्रपटात अजून मसाला टाकण्याची गरज होती, अनेक ठिकाणी चित्रपट आवश्यकतेपेक्षा संथ वाटला आहे. 

चित्रपटातील स्टार कास्टचा अभिनय

मनोज वाजपेयींचा अभिनय कमाल आहे, मनोज वायपेयींनी या चित्रपटात अनेक ठिकाणी खूपच बोल्ड सीन्स दिले आहेत, जे यापूर्वी त्यांनी कधीच दिलेले नाहीत. ते स्क्रिनवर तुम्हाला एका वेगळ्याच गोष्टीचा अनुभव देतात, ते एखाद्या क्राईम रिपोर्टरसारखे दिसतात. ते बाईकवरुन जात असताना काही गुंड त्यांच्या मागे येतात, बाईक चालवताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी भिती अप्रतिम आहे. शहाना गोस्वामीनं मनोजच्या बायकोच्या भूमिकेत अप्रतिम काम केलं आहे. शहाना गोस्वामीनं एका अशा पत्नीची भूमिका साकारली आहे, जी तिच्या पतीला अजिबातच आवडत नाही. चित्रपटात एक सीन आहे, आपल्या नवऱ्यासोबत इंटिमेट असताना मनोज वाजपेयी तिला शिवीगाळ करतात, त्यावेळी शहानाच्या चेहऱ्यावरचे भाव अप्रतिम आहेत. अर्चिता अग्रवाल नवीन आहे पण ती मनोज आणि शहानासमोर फिकी पडत नाही, एका सीनमध्ये ती एका सोसायटीच्या अधिकाऱ्याला फटकारते, जो तिला भाड्यानं फ्लॅट घेण्याऐवजी निरुपयोगी नियम आणि कायदे समजावून सांगतो, हे दृश्य आजच्या एका कणखर स्त्रीचं प्रतिबिंब अधोरेखीत करतं. अर्चिताचं काम खूप चांगले आहे आणि तिला भविष्यात भरपूर वाव आहे.

दिग्दर्शन 

Despatch कनु बहल यांनी दिग्दर्शित केला आहे आणि त्यांनीच  इशानी बनर्जीसोबत याचं लेखनंही केलं आहे. आणि हाच फिल्मचा सर्वात कमजोर पॉईंट आहे, चित्रपटाच्या रायटिंगमध्ये खूप काही मिसिंग आहे, तसेच, आणखी मसाल्याचीही गरज होती. फिल्म कमर्शियल करण्यासाठी आणखी काही गोष्टींची गरज होती किंवा कथेची मांडणी नीट करायला हवी होती. एंडिंग तर खूपच खराब आहे. 

एकूणच पाहता मनोज बाजपेयींना पाहायचं असेल तर चित्रपट बिनधास्त पाहू शकता. त्यांच्या अभिनयासाठी पाहायचा असेल तर बिनधास्त पाहा... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात;  तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Parab Full Speech : अनिल परब म्हणाले, तो नेपाळी..ठाकरे गालातल्या गालात हसले!ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 4PM 25 March 2025Amol Mitkari On Sahitya Issue : महापुरुषांबाबत अवमानकारक साहित्यावर बंदी आणणार, अमोल मिटकरींनी सभागृहात काय मागणी केली?Top 100 Superfast News : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 25 March 2025 : 3 Pm

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात;  तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं आणि रोख रक्कम घेऊन जाता येते? यासाठी नेमके नियम कोणते? 
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं घेऊन जाता येतं? यासाठी नेमके नियम कोणते? 
Bangladesh : बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्यासाठी लष्कराची हालचाल सुरू
बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्यासाठी लष्कराची हालचाल सुरू
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
Embed widget