LIVE UPDATE | श्रीनगर : लाल चौक इथे दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, एकाचा मृत्यू, 12 जखमी

Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
सकाळच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. शिवसेना-भाजपत दबावाचं राजकारण शिगेला, शिवसेना खासदार संजय राऊत आज राज्यपालांना भेटणार, शिवतीर्थावर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचा संजय राऊतांचा दावा
2. मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेल्या शिवसेनेसाठी महसूल आणि अर्थ खातं सोडण्याची भाजपची तयारी, सूत्रांची माहिती, तर चर्चा फक्त मुख्यमंत्रिपदावरच होणार, सेना ठाम
3. सोनिया गांधींसोबतच्या बैठकीसाठी शरद पवार दिल्लीत दाखल, तर शेतकऱ्यांसाठी जादा मदत मागण्याच्या निमित्तानं फडणवीस शाहांना भेटण्याची शक्यता
4. हेक्टरी २५ हजारांची नकसान भरपाई द्या, सरकारवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंची मागणी, तर शेतकऱ्यांसाठी लगेच सरकार स्थापन होणं गरजेचं, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
5. दिल्लीत आजपासून ऑड-इव्हन फॉर्म्युला लागू, नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना ४ हजारांचा दंड, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रीही नियम पाळणार
6. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे कोकणासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याकडून मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा























