एक्स्प्लोर

Winter Travel: जानेवारीत मुंबईहून काश्मीरला जाण्याचा आहे प्लॅन? गर्दीपासून दूर शांतता अनुभवा, फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Winter Travel: मुंबईचे जीवन हे वेगवान, गर्दीचे आणि गोंगाटाचे आहे, काश्मीरचा सुंदर निसर्ग आणि शांत दऱ्या अनेकांना येथे येण्यास भाग पाडतात.

Winter Travel: काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते. आपल्यापैकी अनेकांचं स्वप्न असतं, आयुष्यात एकदी तरी काश्मीरला जायचं. त्यासाठी अनेकजण आधीच प्लॅन करतात, पैसै जमवतात. कारण काश्मीरला जाणं एखाद्या स्वर्गसुखापेक्षा कमी नाही. खास करून मुंबईकरांसाठी काश्मीरला भेट देणे एक छान अनुभव ठरू शकतो.

मुंबईकरांनो.. हिवाळ्यात प्रथमच काश्मीरला भेट देण्याचा विचार करताय तर...

मुंबई हे समुद्र किनारी वसलेले महानगर आहे, जे समुद्राच्या दृश्यांसाठी आणि उबदार हवामानासाठी ओळखले जाते. पण तुम्ही मुंबईत बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकत नाही किंवा तुम्हाला इथे हिरवेगार वातावरण, पर्वतांचे सुंदर दृश्य बघायला मिळणार नाही. त्यामुळे मुंबईतील लोकांना काश्मीरला जायला खूप आवडते. बर्फाच्छादित पर्वत, हिरवेगार मैदान आणि काश्मीरचे थंड हवामान यामुळे मुंबईकरांना वेगळेपण जाणवते. काश्मीरमधील शिकारा राईड आणि सरोवर मधील हाऊसबोटमध्ये राहण्याचा अनुभव मुंबईकर कधीच विसरू शकत नाहीत. जर तुम्ही हिवाळ्यात पहिल्यांदाच काश्मीरला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. कारण इथे प्रवास केल्यास जास्त पैसे खर्च होऊ शकतात.

काश्मीरची थंडी सहन करणे कठीण होऊ शकते..

मुंबईत थंडी नसते, तर काश्मीर हिवाळ्यात बर्फाने झाकलेले असते. अशा परिस्थितीत मुंबईकरांना काश्मीरमधील बर्फाळ थंडी सहन करणे अधिक कठीण होऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त जाड कपडे सोबत ठेवा. फॅशनसाठी लोक अनेकदा पातळ कपडे सोबत घेऊन जातात, पण इथे त्यांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागतो.

पाऊस आणि बर्फ टाळण्यासाठी उपाय करा

जर तुम्हाला बर्फाशी खेळायचे असेल तर तुम्ही सोबत हातमोजे ठेवावे जे बर्फाने ओले होणार नाहीत. तुम्ही तुमच्यासोबत लेदर किंवा चामड्याचे हातमोजे घ्यावेत. याशिवाय छत्री आणि रेनकोट सोबत ठेवा. हे तुम्हाला बर्फ आणि पावसात ओले होण्यास मदत करेल.

आगाऊ हॉटेल बुकिंग करा

तुम्ही नवीन वर्ष किंवा बर्फवृष्टीसारख्या कोणत्याही खास प्रसंगी काश्मीरला जात असाल तर तुम्ही आगाऊ हॉटेल बुकिंग करा. आगाऊ हॉटेल्स बुक केल्याने तुम्हाला जास्त खर्च येणार नाही. यावेळी नवीन वर्ष येण्यास फारसा वेळ नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अद्याप हॉटेल बुकिंग केले नसेल, तर आता तुम्हाला येथे महागडे हॉटेल्स मिळू शकतात. नवीन वर्षानंतर येथे भेट देण्याचा प्रयत्न करा. काश्मीर हे भारतातील सर्वोत्तम बर्फाच्या ठिकाणांपैकी एक मानले जाते.

स्थानिक सुरक्षा माहिती

काश्मीरमधील काही भागात सुरक्षेच्या कारणास्तव प्रवाशांना जाण्यापासून रोखले जाते. अशा परिस्थितीत, येथे जाण्यापूर्वी तुम्ही स्थानिक लोकांशी बोलू शकता. याशिवाय, जर तुम्ही एखाद्या उंच ठिकाणाला भेट देणार असाल तर तुम्ही स्थानिक लोकांशी याबद्दल बोलू शकता. प्रवासात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. कारण इतरांच्या तुलनेत स्थानिक लोक तुम्हाला योग्य माहिती देतील.,

हेही वाचा>>>

Tirupati Online Darshan: व्यंकटरमणा...गोविंदा.. तिरुपती दर्शनासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू, कसं कराल बुकिंग? गर्दी टाळण्यासाठी काय काळजी घ्याल? 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
Walmik Karad: वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला, सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही
वाल्मीक कराडसमोर सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही, गेल्या 24 तासांत काय घडलं?
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याचं सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याचं सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 30 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 30 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:   8 AM : 30 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी
Walmik Karad: वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला, सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही
वाल्मीक कराडसमोर सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही, गेल्या 24 तासांत काय घडलं?
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याचं सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी भूमिका घेईल ती आम्हाला मान्य; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याचं सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
Team India WTC Final Scenario : मेलबर्न कसोटी हरली तर टीम इंडिया कशी जाणार WTC फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण
मेलबर्न कसोटी हरली तर टीम इंडिया कशी जाणार WTC फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण
दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत खून, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत खून, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
मोठी बातमी : महाराष्ट्र राज्याची 'आरोग्य व्यवस्था' धोक्यात? सुरक्षेच्या बाबतीत त्रुटी, डाॅक्टरांची 42 टक्के पदंही रिक्त
मोठी बातमी : महाराष्ट्र राज्याची 'आरोग्य व्यवस्था' धोक्यात? सुरक्षेच्या बाबतीत त्रुटी, डाॅक्टरांची 42 टक्के पदंही रिक्त
Astrology : आज सोमवती अमावस्येच्या दिवशी जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींची होणार भरभराट, अचानक धनलाभाचे संकेत
आज सोमवती अमावस्येला जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींची होणार भरभराट, अचानक धनलाभाचे संकेत
Embed widget