एक्स्प्लोर

Beauty Tips: प्रेमाचं प्रतिक असलेल्या गुलाबाचा असाही वापर; वाढवा त्वचेचं सौंदर्य, असा तयार करा 'रोझ फेसपॅक'

गुलाबाचा वापर करुन फेसपॅक (Beauty Tips) कसा तयार करायचा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घ्या रोज फेस पॅक तयार करायची सोपीपद्धत...

Beauty Tips: आज अनेक कपल्स   व्हॅलेंटाईन डे (Valentines Day)  साजरा करत आहेत. प्रेमीयुगुल हे एकमेकांना वेगवेगळे गिफ्ट देऊन व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. या दिवशी बरेच लोक आपल्या पार्टनरला गुलाब भेट म्हणून देतात. प्रेमाचं प्रतिक असणाऱ्या गुलाबाचा वापर विविध फेसपॅक तयार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. गुलाबाचा वापर करुन फेसपॅक (Beauty Tips) कसा तयार करायचा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घ्या रोज फेस पॅक तयार करायची सोपीपद्धत...

गुलाब पेस्ट तयार करण्याची सोपी पद्धत

गुलाबाचे विविध फेसपॅक तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुलाबाची पेस्ट तयार करावी लागेल. ताज्या गुलाबाच्या पाकळ्या घ्या आणि त्या पाण्यानं स्वच्छ करा. या पाकळ्या मिक्समध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. या पेस्टचा वापर तुम्ही विविध फेसपॅक तयार करण्यासाठी करु शकता. 

गुलाब हनी फेस पॅक (Honey And Rose Facepack) 

तयार केलेल्या गुलाबाच्या पेस्टचा वापर करुन तुम्ही गुलाब हनी फेस पॅक तयार करु शकता. यासाठी गुलाबपेस्टमध्ये गुलाब पाणी आणि मध मिक्स करा. हा पॅक चेहऱ्याला 20 मिनिटे लावा. त्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुवा. या पॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा हायड्रेट राहिल. तसेच चेहऱ्यावरील डाग देखील या फॅसपॅकमुळे कमी होतील.

गुलाब चंदन फेसपॅक (Sandalwood And Rose Facepack)

गुलाबा पेस्टमध्ये चंदन पावडर मिक्स करा. त्यानंतर या मिश्रणात थोडे एक किंवा दोन चमचे दूध टाका. हा पॅक चेहऱ्यावर लावताना मसाज करा. हा पॅक जवळपास दहा मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा. या फेसपॅकमुळे चेहऱ्याचे स्क्रबिंग होते. त्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते. 

कोरफड जेल आणि गुलाबाचा पॅक  (Aloe Vera And Rose Facepack)

गुलाबाच्या पेस्टमध्ये  कोरफड जेल मिक्स करून  चेहऱ्याला लावा. वीस मिनिटांनी चेहरा धुवा. या पॅकमुळे स्किन टायनिंग होते. तसेच चेहऱ्यावरील डाग देखील जातात. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या इतर बातम्या : 

Coffee Side Effects : कॉफी पिताय, तर सावधान! कोलेस्ट्रॉल वाढण्याचं ठरेल कारण, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
Hasan Mushrif : म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
Baburao Chandore: अजिदादांच्या मर्जीतील नेता, पालिकेच्या कंत्राटदारांचा 'मसीहा'; बाबुराव चांदेरेला अटक करायला पोलीस इतके का कचरतायत?
अजिदादांच्या मर्जीतील नेता, पालिकेच्या कंत्राटदारांचा 'मसीहा'; बाबुराव चांदेरेला अटक करायला पोलीस इतके का कचरतायत?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MahaKumbh Mela | Amit Shah  यांचं  प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यात पवित्र स्नानAmey Khopakar :Chhaava चित्रपटावर MNS ची भूमिका काय? Laxman Utekar Raj Thackeray भेटीची A - Z माहितीPratap Sarnaik : परिवहनमंत्र्यांना न विचारताच ST ची भाडेवाढ? प्रताप सरनाईकांची थेट उत्तरेDnyaneshwari Munde  Mahadev Munde  खूनातील आरोपींना अटक करणार;अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षकांचं आश्वासन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
Hasan Mushrif : म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
Baburao Chandore: अजिदादांच्या मर्जीतील नेता, पालिकेच्या कंत्राटदारांचा 'मसीहा'; बाबुराव चांदेरेला अटक करायला पोलीस इतके का कचरतायत?
अजिदादांच्या मर्जीतील नेता, पालिकेच्या कंत्राटदारांचा 'मसीहा'; बाबुराव चांदेरेला अटक करायला पोलीस इतके का कचरतायत?
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा
Embed widget