Valentine Day : लाल इश्क...! प्रेमाचा रंग 'लाल'च का असतो? 'हे' कारण तुम्हालाही माहीत नसेल
Colour of Love Red : लाल रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे. पण मागचं नेमकं कारण काय? प्रेम आणि लाल रंग यामधील संबंध काय, जाणून घ्या.
Why is Red the Colour of Love : आज व्हॅलेंटाईन डे (Valentine Day 2023) आहे. या दिवशी प्रत्येक जण आपल्या जोडीदारासमोर भावना व्यक्त करतात. प्रेम (Love) म्हटलं की लाल रंगाचा (Red Color) उल्लेख होतो. प्रेमी युगुलांसाठी हा रंग खास मानला जातो. नवरा-बायकोही एकमेकांना प्रेमाची भेटवस्तू देताना प्रामुख्यानं याच रंगाची निवड करतात. जोडीदाराला प्रेमाने कोणतीही वस्तू द्यायची म्हटली तर त्यासाठी प्रत्येक जण लाल रंगाला प्राधान्य देतात, मग लाल रंगाचं गुलाब, लाल फुलं किंवा इतर कोणत्याही लाल रंगाच्या वस्तूची निवड केली जाते.
जगभरात विविध रंग आहेत. प्रत्येक व्यक्तीचा आवडता रंग वेगळा असतो. पण प्रेम म्हटलं की सर्वांच्या डोळ्या समोर फक्त लाल रंग येतो. लाल रंगाला प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. पण प्रेमाचा रंग 'लाल'च का असतो? यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का, नसेल तर जाणून घ्या.
प्रेम आणि लाल रंगाचं नातं
प्रेम आणि लाल रंगाचा संबंध फार पूर्वीपासून आहे. प्रेम आणि लाल रंगाचं नातं इतिहास काळापासून प्रचलित आहे. 13 व्या शतकातील एका प्रसिद्ध फ्रेंच कवितेमध्ये याचा उल्लेख आहे. या कवितेमध्ये कवी एका बागेत लाल रंगाचं फूल शोधतं आहे, असं वर्णन आहे. या कवितेतील लाल फूल म्हणजे त्याचा जोडीदार आणि प्रेम असा अर्थ लावला जातो. त्यामुळे कवी त्याच्या आयुष्यातील प्रेम आणि प्रिय व्यक्तीची वाट पाहत आहे, अशी मान्यता आहे.
'हे' ही आहे कारण?
लाल रंग जीवनाचं प्रतीक आहे. आपल्या रक्ताचा रंग लाल आहे. त्यामुळे लाल रंगाचा संबंध जीवनाशी असल्याचं म्हटलं जातं. लाल रंग म्हणजे जणू तुमचं अस्तित्व असाही त्याचा अर्थ लावला जातो. आणखी एक कारण म्हणजे लाल रंग हा धर्माशी संबंधित आहे.
लाल रंगाचं धार्मिक महत्त्व
लाल रंग धार्मिक कार्यांसाठी शुभ मानला जातो. हिंदू धर्मात कोणतंही धार्मिक कार्य, पूजा किंवा विवाह यासाठी लाल रंग महत्त्वाचा मानला जातो. जीवनाशी याचा संबंध म्हणूनच लाल रंग प्रेमाचं प्रतिक मानला जातो.
लाल रंगातून मिळतो ऊर्जेचा संदेश
त्याचप्रमाणे, प्रत्येक रंग एक वेगळा संदेश देतो. प्रत्येक रंगाची स्वतःची खासियत असते. लाल रंग उत्साहाचा संदेश देतो. यामधून चांगली ऊर्जा मिळते आणि आकर्षणही होते. तुमच्या डोळ्यांसमोर लाल रंग आला, तर तुम्ही त्याकडे नक्कीच आकर्षिक होता. याचा तुमच्या भावनावर परिणाम होतो. त्यामुळे प्रेम आणि लाल रंगाचं नातंही अतूट आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :