Coffee Side Effects : कॉफी पिताय, तर सावधान! कोलेस्ट्रॉल वाढण्याचं ठरेल कारण, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
Coffee Can Increase Cholesterol : कॉफीचं अधिक सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढून अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळेल. हे टाळण्यासाठी येथे दिलेले उपाय करुन पाहा.
Coffee Can Increase Cholesterol : अनेक जणांना कॉफी (Coffee) पिणं आवडतं. कॉफी न प्यायल्यास अनेकांच्या दिवसाची सुरुवातही होत नाही. योग्य प्रमाणात कॉफीचं सेवन शरीरासाठी चांगलं आहे. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट ठरतो. कॉफीचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास (Coffee Side Effects) तुमच्या आरोग्यावर (Health Tips) वाईट परिणाम होऊ शकतो. जास्त प्रमाणात कॉफीचं सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढून अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळेल. त्यामुळे यावर वेळीच उपाय करणं गरजेचं आहे.
कॉफी प्रेमींनो, 'हे' वाचा
जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्यास त्यामुळे आरोग्या संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. कॉफीमध्ये जास्त प्रमाणात कॅफीन (Caffine) असते. याचं अधिक सेवन केल्यात शरीरात कोलेस्टेरॉल वाढते (Cholesterol Increased) आणि हे अनेक गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरतं.
कॉफीमुळे कोलेस्टेरॉल वाढते
कॉफीमुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची (Bad Cholesterol) पातळी वाढते हे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झालं आहे. मात्र, तुम्ही किती कॉफी पितात यावर ते अवलंबून असतो. विशेष म्हणजे कॉफीचा महिला आणि पुरुषांच्या कोलेस्टेरॉलच्या पातळीवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. एका संशोधनानुसार, कॉफीचं जास्त सेवन केल्यानं शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. त्यामुळे कॉफीचं सेवन कमी प्रमाणात करावं.
रिकाम्या पोटी कॉफी पिणंही घातक
रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन केल्याने शरीरातील कोर्टिसोल हार्मोन (Cortisol Hormone) म्हणजेच स्ट्रेस हार्मोनची (Stress Hormone) पातळी वाढते. यामुळे स्त्रियांच्या प्रजननाच्या क्षमतेवर (Ovulation), वजन (Weight) आणि हार्मोन्सवर (Hormonal Effects) वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. शरीरात स्ट्रेस हार्मोन्सची पातळी सकाळी जास्त आणि संध्याकाळी कमी असते. त्यामुळे, जेव्हा तुम्ही सकाळी सर्वात आधी कॅफिनचे सेवन करता तेव्हा कोर्टिसोलची पातळी कमी होते. कोर्टिसोल हार्मोन आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे ते नियंत्रणात राहणं गरजेचं आहे.
कॉफी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
ब्लॅक कॉफी ह्रदयासाठी लाभदायक असल्याचं अभ्यासातून समोर आले आहे. पण यासाठी कॉफीचे सेवन योग्य प्रमाणात करणं गरजेचं आहे. दररोज एक किंवा दोन कप ब्लॅक कॉफी प्यायल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्सही असतात, हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण कॉफीचा अतिरेक आरोग्यासाठी हानिकारक आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या इतर बातम्या :
Green Coffee : 'ब्लॅक कॉफी'नंतर आता 'ग्रीन कॉफी', जाणून घ्या फायदे
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )