Types Of Tulsi : तुमच्या अंगणात असलेल्या तुळशीचे प्रकार नेमके किती? कोणती तुळस तुमच्यासाठी गुणकारी? वाचा सविस्तर
Types Of Tulsi : हिंदू धर्मात दरवर्षी कार्तिक महिन्यातील एकादशीला तुळशी विवाहही केला जातो. यावेळी तुळशी विवाह शुक्रवार 24 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज होणार आहे.
Types Of Tulsi : तुळशीच्या (Tulsi) झाडाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की, तुळशीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते. आपल्याला मंदिर, घर, अंगणात अनेक ठिकाणी तुळशीचं रोप दिसतं. रोज सकाळी तुळशीची पूजा देखील केली जाते. हिंदू धर्मात दरवर्षी कार्तिक महिन्यातील एकादशीला तुळशी विवाहही केला जातो. यावेळी तुळशी विवाह शुक्रवार 24 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज होणार आहे. धार्मिक ग्रंथांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, तुळशीचे रोप सकारात्मकतेचे प्रतीक आहे.
तुळशीचा वापर अनेक वर्षांपासून केला जातोय. तुळशीला एक सकारात्मकतेचा स्त्रोत म्हणून पाहिलं जातं. आयुर्वेदात तुळशीच्या पानांचा वापर घरगुती उपचारांसाठी केला जातो. बहुतेक लोकांच्या घरी तुळस असते, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुळशीचे नेमके किती प्रकार आहेत? चला, तर या ठिकाणी तुळशीच्या सर्व प्रकारां संदर्भात सविस्तर माहिती जाणूवन घेऊयात.
तुळशीचे 4 प्रकार
साधारणत: तुळशीच्या एकूण 60 पेक्षा अधिक प्रजाती पाहायला मिळतात. तुळशीच्या या प्रजाती जगभरात आढळतात. यापैकी बहुतेक प्रजाती हिमालय आणि मध्य पूर्वमध्ये आढळतात. तसेच, जर आपण भारताबद्दल बोललो तर भारतात तुळशीच्या चार प्रकारांची सर्वाधिक चर्चा केली जाते. हे प्रकार नेमके कोणते ते जाणून घ्या
कृष्ण तुळस : कृष्ण तुळशीची पाने गडद हिरव्या किंवा जांभळ्या रंगाची असतात. असं म्हटलं जातं की, श्रीकृष्णाला कृष्ण तुळशीची फार आवड होती. या तुळशीची पाने देखील कृष्णाच्या रंगासारखीच असतात. तसेच, श्रीकृष्णाचे नावदेखील कृष्ण आहे. त्यामुळे ही तुळस कृष्ण तुळस म्हणून ओळखली जाते.
राम तुळस : राम तुळशीच्या पानांचा रंग हिरवा असतो. असे मानले जाते की, रामाला तुळस फार प्रिय होती. म्हणून ही तुळस राम तुळस म्हणून ओळखली जाते. राम तुळशीची पाने गोड असतात. ही तुळस घरामध्ये लावल्याने घरातील सुख-समृद्धी वाढते. राम तुळशीचा उपयोग पूजेत देखील केला जातो.
वन तुळस : वन तुळस भारत, श्रीलंका, जावा आणि आफ्रिकेच्या उत्तर भागात आढळते. वन तुळस ही राम आणि कृष्ण तुळशीपेक्षा वेगळे आहे. त्यात वृद्धत्वविरोधी घटक आढळतात.
कापूर तुळस : कापूर तुळस त्याच्या सुखद सुगंधासाठी ओळखली जाते. कापूर तुळस मलेरिया, डायरिया, ब्राँकायटिस आणि त्वचेशी संबंधित समस्यांवर वापरली जाते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Tulsi Water Benefits : तुळशीचे पाणी शरीरासाठी गुणकारी; 'या' आजारांवर रामबाण उपाय