Kitchen Tips : तुम्ही जे पनीर खाता ते चांगलं की बनावट? बाजारातून आणताच 'असं' तपासा
Kitchen Tips : पनीर खाल्ल्याने स्नायूंचा विकास होतो आणि हाडे मजबूत होतात.
Kitchen Tips : खरंतर, शाकाहारी लोकांसाठी पनीर (Paneer) हे एक सुपरफूड आहे. अनेक शाकाहारी खवय्ये पनीर अगदी आवडीने खातात. पनीरपासून अनेक पदार्थ घरी अगदी सहज बनवता येतात. मग ते पनीर बुर्जी असो, पालक पनीर, पनीर पराठा, पनीर टिक्का असो किंवा आजच्या मुलांना आवडणारे अगदी पिझ्झा असो किंवा फ्रॅंकी, मॅगी या सगळ्या पदार्थांना पनीरमुळे छान चव येते. त्यामुळे कोणताही सण असो किंवा पार्टी, पनीरची रेसिपी नेहमीच असते. चवीबरोबरच पनीर आरोग्यासाठीही उत्तम आहे. पनीरमध्ये कॅल्शियम आणि हेल्दी फॅट्स मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय त्यात लोह देखील आढळते. पनीर खाल्ल्याने स्नायूंचा विकास होतो आणि हाडे मजबूत होतात. पण प्रश्न पडतो की आपण जे पनीर खातो ते चांगलं की बनावट आहे? कारण आजकाल बाजारात खरं आणि बनावट दोन्ही गोष्टी मिळतात. मग आपण जे पनीर खातो ते पोषक तत्वांनी युक्त आहे हे खरे आहे की बनावट हे कसे कळणार? आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही खऱ्या आणि बनावट पनीरमधील फरक सहज ओळखू शकता.
चांगलं आणि बनावट पनीरमध्ये फरक कसा करायचा?
पनीर खरेदी केल्यानंतर लगेच 'हे' काम करा
यासाठी सर्वात आधी तुम्हाला बाजारातून पनीर आणावे लागेल. बाजारातून पनीर विकत घेताना ते आपल्या हातांनी कुस्करून पाहा. पनीरमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ असेल तर ते लगेच तुटते. पनीर सहसा दूध पावडर आणि स्किम्ड पावडरपासून बनवले जाते. या प्रकारचे पनीर तुमच्या पोटासाठी खूप हानिकारक आहे.
सोयाबीन पावडरवरूनही बनावट चीज ओळखता येते.
यासाठी सर्वात आधी पनीर गरम पाण्यात उकळून त्यात सोयाबीन पावडर किंवा मैदा घाला. सोयाबीन पावडर किंवा मैद्याचं पीठ मिक्स करताच पनीरचा रंग बदलतो. बनावट पनीरचा रंग बदलू शकतो.
दोघांचा नरमपणा पाहून तुम्हाला कळेल
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पनीर बनवताना युरियाचा वापर केल्यास उकळताना त्याचा रंग लाल होतो. जे शरीरासाठी खूप हानिकारक आहे. खऱ्या आणि बनावट पनीर मध्ये एक विशेष फरक असा आहे की, खरं पनीर जास्त मऊ असते तर बनावट पनीर घट्ट असते. घट्ट पनीरला हात लावताच ते रबरासारखे पसरते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :