Gudi Padwa 2026 : लाल, केशरी की गुलाबी? गुढी उभारताना गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी? वाचा ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय...
Gudi Padwa 2026 : यंदा 19 मार्चला गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे. मात्र, यंदा गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.

Gudi Padwa 2026 : हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांपैकी एक स्थान गुढीपाडव्याचं (Gudi Padwa) आहे. या दिवशी हिंदू नवं वर्षाची सुरुवात होते. तसेच, या दिवशी नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण 'गुढीपाडवा' म्हणून साजरा करतात. या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. त्यानुसार, यंदा 19 मार्चला गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे. मात्र, यंदा गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी हा प्रश्न तुमच्याही मनात आला आहे का? तर, ज्योतिषाचार्य डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी ही दिलेली माहिती तुमच्यासाठीच आहे.
गुढीच्या साडीचा रंग कसा असावा?
गुढीसाठी साधारणपणे डकडकती आणि प्रसन्न रंगांची निवड केली जाते. खालील रंग गुढीसाठी अधिक शुभ मानले जातात.
गडद पिवळा किंवा केशरी : हे रंग मांगल्याचे आणि चैतन्याचे प्रतीक मानले जातात. तुम्ही गुढीला या रंगाची साडी नेसवू शकता.
लाल किंवा मरुन : विजय आणि शक्तीचे प्रतीक म्हणून लाल रंगाची साडी वापरली जाते.
हिरवा : निसर्ग आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून अनेक घरांमध्ये हिरव्या रंगाची साडी (विशेषतः काठपदराची) नेसवली जाते.
काही महत्त्वाच्या टिप्स :
1. साडीचा प्रकार : शक्यतो जरीचा काठ असलेली रेशमी साडी किंवा 'खण' वापरावा. यामुळे गुढीला एक पारंपरिक आणि भव्य रूप येते. गुढी अधिक सुंदर दिसते.
2. रंग टाळा : गुढीला कधीही काळ्या रंगाची साडी नेसवत नाहीत. कारण काळा रंग मंगल कार्यात अशुभ मानला जातो.
शास्त्रानुसार कोणत्याही विशिष्ट एकाच रंगाचा आग्रह धरण्यापेक्षा, वर दिलेल्या शुभ रंगांपैकी जी तुमच्याकडे उपलब्ध असेल किंवा जी तुम्हाला आवडेल ती साडी तुम्ही वापरू शकता.
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त 2026 (Gudi Padwa Shubh Muhurta 2026)
चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. यंदा 19 मार्च 2026 ला गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. या दिवशी तिथीची सुरुवात 19 तारखेला सकाळी 6.52 वाजता होईल. तर, 20 मार्च 2026 रोजी पहाटे 4.52 ला ही तिथी समाप्त होईल. गुढी पाडव्याच्या दिवस हा सूर्योदयाच्या वेळेवर आधारित असल्यामुळे यात थोडाफार फरक जाणवू शकतो.
डॉ. भूषण ज्योतिर्विद
हे ही वाचा :
Weekly Horoscope: पैसा..नोकरी..प्रेम जीवनात मोठं वळण! फेब्रुवारीचा तिसरा आठवडा कसा जाणार? कोणत्या राशी मालामाल होणार? साप्ताहिक राशीभविष्य



















