एक्स्प्लोर

तुम्हाला वारंवार सेल्फी घेण्याची सवय आहे? असं असेल तर हे नक्कीच वाचा!

mobile selfie : प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे आणि आपल्या स्पेशल आठवणी मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी अनेकजण सेल्फी काढत असतात.  सेल्फीचे वेड प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना आहे.

mobile selfie : : प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे आणि आपल्या स्पेशल आठवणी मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी अनेकजण सेल्फी काढत असतात.  सेल्फीचे वेड प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना आहे. चार मित्र किंवा मैत्रिणी भेटले किंवा एकटं असलं तरी लगेच सेल्फी घेतला जातो. हॉटेलमध्ये जेवायला जरी गेले, किंवा मित्राच्या वाढदिवसाची पार्टी असली, तरीही हमखास सेल्फी घेतला जातो. इतकेच काय ट्रेकिंग वेळीही सेल्फी काढण्याचा अनेकांना मोह आवरत नाही. पण तुम्हाला वारंवार सेल्फी घेण्याची हौस असेल, तर सावधान. कारण हे एखाद्या मानसिक रोगाचे लक्षणही असू शकते.

तज्ञांच्या मते, दिवसभरात वारंवार सेल्फी घेण्याने माणूस आत्मकेंद्री होतो.  तसेच किशोरवयीन आणि तरुणवर्गासाठी हा सर्वात घातक रोग आहे. सेल्फीचे धोके डॉक्टरांच्या मते, सेल्फीमुळे लोक आत्मकेंद्री बनतात. तसेच स्वत:ला सुंदर दाखवण्याच्या प्रयत्नात तुम्ही एखाद्या कृत्रिम जगात वावरु लागता. शिवाय तुमच्या कामावर आणि शिकण्याची क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो. यातून तुम्ही स्वत: नैराश्येच्या गर्तेत ढकलेले जाता. विशेष म्हणजे या सर्वामुळे तुमच्या सामाजिक वागणुकीवरही परिणाम होतो, असा निष्कर्ष तज्ञांनी मांडला आहे. 

नवी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयाचे मनोविशेषज्ञ डॉ. आरती आनंद यांच्या मते, तरुण वयात सेल्फी घेण्याच्या सवयीमुळे तुमच्या व्यक्तीमत्त्वावर परिणाम होतो. तसेच कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला पुढे येण्यात अडथळे निर्माण होतात. अनेकांना ऑफिसमध्ये काम करतानाही सेल्फी घेण्याची सवय असते. तेव्हा सेल्फीला समाजमान्यता असली, तरी वारंवार सेल्फी घेण्याची सवय मानसिक स्वस्थ्यावर विपरित परिणाम करते, असं तज्ञांचं मत आहे. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Super Fast | विधानसभा निवडणुकीच्या बातम्या सुपरफास्ट एका क्लिकवरAjit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget