![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Health Tips : 'हा' आजार असलेल्यांनी चुकूनही करू नये शेंगदाण्यांचे सेवन; आरोग्यासाठी ठरेल हानिकारक
Health Tips : काही लोकांना शेंगदाणे जास्त खाल्ल्यानं त्रास होऊ शकतो.
![Health Tips : 'हा' आजार असलेल्यांनी चुकूनही करू नये शेंगदाण्यांचे सेवन; आरोग्यासाठी ठरेल हानिकारक health tips disadvantages of eating peanuts Health Tips : 'हा' आजार असलेल्यांनी चुकूनही करू नये शेंगदाण्यांचे सेवन; आरोग्यासाठी ठरेल हानिकारक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/08/d2b8e097554d2ceee216f9ef69ea3e69_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Health Tips : अनेकांना जेवण करताना किंवा बाहेर फिरायला जाताना शेंगदाणे खायला आवडतात. शेंगदाण्यांमध्ये मॅग्नेशियम, फोलेट यांसारखी पोषक तत्वे असतात. काही लोक पीनट बटरचा समावेश देखील डाएटमध्ये करतात. तसेच उकडलेले आणि भाजलेले शेंदगाणे खायला अनेकांना आवडते. शेंगदाणे खाल्यानं जेवढे फायदे होतात. तेवढेच तोटे देखील होतात. त्यामुळे काही लोकांना शेंगदाणे जास्त खाल्ल्यानं त्रास होऊ शकतो. जाणून घेऊयात कोणत्या लोकांनी शेंगदाण्यांचे जास्त सेवन करू नये.
लिव्हरची समस्या
ज्या लोकांना लिव्हरसंबंधित आजार असतील त्यांनी शेंगदाण्यांचे अति सेवन करू नये. शेंणगदाण्यांमधील काही तत्वांमुळे लिव्हरवर वाईट परिणाम होतो.
वजन जास्त असलेल्यांनी करू नये शेंगदाण्याचे सेवन
जर तुमचे वजन जास्त असेल तर तुम्ही आहारामध्ये शेंगदाण्यांचा समावेश करू नये. कारण शेंगदाण्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुमचे वजन वाढेल.
बाजारात सध्या मिठाचा वापर करून उकडलेले किंवा भाजलेले शेंगदाणे लोक विकतात. त्या शेंदाण्यांना मिठ लावलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला हाय बिपी, हार्ट प्रोब्लेम्स इत्यादी आजार असणाऱ्या लोकांनी बाजारात मिळणाऱ्या या शेंगदाण्याचे सेवन करू नये.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Womens Day Google Doodle : महिलांना समर्पित आजचे खास गुगल डूडल, महिला दिनाच्या दिल्या शुभेच्छा
- Womens Day 2022 : महिला दिन का साजरा केला जातो? यंदाची थीम काय?
- Russia Ukraine Conflict : पोलंडमधील 'ऑपरेशन गंगा' मोहीम फत्ते, जखमी हरजोतला घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान मायदेशी परतले
- Women's Day 2022 : जागतिक महिला दिनाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)