Zero Calorie Sugar : सावधान! झीरो कॅलरी शुगर आरोग्यासाठी घातक, हृदयविकाराचा वाढता धोका
Zero Calorie Sugar Risk : एका संशोधनात असे समोर आले आहे की, झीरो कॅलरी शुगरचं सेवन म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे.
Zero Calorie Sugar Substitute : वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक जण साखरे (Sugar) ऐवजी आर्टिफिशियल स्वीटनरचा (Artificial Sweetner) वापर करतात. झीरो कॅलरी शुगर (Zero Calorie Sugar) साखरेपेक्षा (Sugar) कमी नुकसानकारक असते, असं म्हटलं जातं. पण नवीन संशोधनात झीरो कॅलरी शुगरबाबत मोठी धक्कादायक बाब उघड झाली आहे. या संशोधनानुसार, झीरो कॅलरी शुगर आरोग्यासाठी घातक असल्याचं समोर आलं आहे. एका संशोधनात असे समोर आले आहे की, झीरो कॅलरी शुगरचं सेवन म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे.
झीरो कॅलरी शुगरचं सेवन मृत्यूला आमंत्रण
झीरो कॅलरी शुगर सेवन करणाऱ्यांनो ही बातमी तुमच्यासाठी आहे. आरोग्यासाठी घातक असल्याचं एका नव्या संशोधनात समोर आलं आहे. एरिथ्रिटॉल नावाच्या झीरो कॅलरी साखरेमुळे हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो, असा या संशोधनात उघड झालं आहे. क्लीव्हलँड क्लिनिकच्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. या संशोधनात असं म्हटलं आहे की, रक्तातील एरिथ्रिटॉलचे प्रमाण वाढल्याने हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो.
झीरो कॅलरी शुगर आरोग्यासाठी घातक
नुकत्याच झालेल्या एका संशोधनात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या संशोधनात आढळून आलं आहे की, झीरो कॅलरी शुगरचे सेवन केल्याने शरीरात रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. यामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि मृत्यूचा धोका वाढतो. ही फार चिंतेची बाब आहे, कारण झीरो कॅलरी शुगरच्या सेवनामुळे मृत्यूचा धोका अनेक पटींनी वाढतो.
एरिथ्रिटॉलमुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका
क्लीव्हलँड क्लिनिक लर्नर रिसर्च इन्स्टिट्यूटने ब्रिटन (UK) आणि युरोपमधील (Europe) सुमारे 4 हजार लोकांवर संशोधन केलं. या संशोधनात या लोकांच्या शरीरावरील आर्टिफिशल स्वीटनरच्या प्रभावाचं निरीक्षण करण्यात आलं. या संशोधनात असं आढळून आलं की, एरिथ्रिटॉल झीरो शुगरचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. रक्तातील एरिथ्रिटॉल झीरो शुगरची पातळी वाढत जाते, त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो, रक्त गोठल्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोकाही वाढतो.
झीरो कॅलरी शुगरचा आरोग्यावर वाईट परिणाम
संशोधनात सहभागी असलेल्या एका वरिष्ठ सांगितलं की, झीरो शुगर सेवन करणाऱ्यांचा असा समज आहे की, यामुळे आपल्या आरोग्याला कोणताही धोका नाही. त्यामुळे हे लोक याचं सर्रास सेवन करतात. असे लोक झीरो-शूगर कोल्ड्रिंकचं सेवन जास्त प्रमाणात करतात. पण झीरो कॅलरी शुगरचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो, असं सशोधनात समोर आलंय.
हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजारांचा धोका
एरिथ्रिटॉल झीरो शुगरमुळे रक्तातील प्लेटलेट्समध्ये गुठळ्या होण्याची शक्यता वाढतो. कमी गोड किंवा झिरो कॅलरी साखर असणारे पदार्थ सुरक्षित असतात, असं सांगितलं जात होतं. पण झीरो कॅलरी साखरेमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजारांचा धोका वाढतो हे समोर आलं आहे.
आर्टिफिशल स्वीटनर एरिथ्रिटॉल म्हणजे काय?
एरिथ्रिटॉल म्हणजेच आर्टिफिशल स्वीटनर यालाच झीरो शुगर असंही म्हणतात. हे एक कृत्रिम स्वीटनर आहे. साखरेएवजी पदार्थाची चव गोड करण्यासाठी केला जातो. खाद्यपदार्थ तसेच उत्पादनांमध्ये साखरेऐवजी गोडपणासाठी पर्याय म्हणून एरिथ्रिटॉल वापरलं जातं. एरिथ्रिटॉल मशरुम, द्राक्षे, कलिंगड आणि पेर यांसारख्या फळांमध्ये देखील नैसर्गिकरित्या आढळते. तसेच सोया सॉस, वाईन आणि चीज यासारख्या आंबलेल्या पदार्थांमध्ये देखील एरिथ्रिटॉल मोठ्या प्रमाणात असते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )