एक्स्प्लोर

Parenting Tips : पालकत्वाचं नियोजन करताय? जरा थांबा, महिलांमधील प्रजननक्षमता सुधारण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' बदल

Parenting Tips : पुरक आहार आणि जीवनशैलीतील बदल हे पुरुष आणि महिलांमधील प्रजननक्षमता सुधारण्यास मदत करतात.

Parenting Tips : गर्भधारणेची तयारी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोडप्यांचे आरोग्य (Health). निरोगी पालक निरोगी बाळाला जन्म देऊ शकतात.यासाठी जीवनशैलीत योग्य बदल करणे गरजेचे आहे. यशस्वी गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी जोडप्याने दैनंदिन जीवनात निरोगी आहार- विहाराच्या सवयींचा अवलंब केला पाहिजे. पुरक आहार आणि जीवनशैलीतील बदल हे पुरुष आणि महिलांमधील प्रजननक्षमता सुधारण्यास मदत करतात.

या संदर्भात मुंबईतील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी हॉस्पिटलचे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. रितू हिंदुजा यांनी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत. 

1. संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा

* हार्मोनल संतुलन आणि प्रजनन आरोग्य चांगले रहावे यासांची तुमच्या आहारात आवश्यक बदल करा.

* ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करा

* क्विनोआ, ब्राऊन राईस, ओट्स यांचा आहारात समावेश करा

* मसूर, शेंगा आणि प्रथिनांचा आहारात समावेश करा (उदा .मासे, चिकन, टोफू)

* लोह, जस्त, ओमेगा-3 फॅटी अॅसिड, फॉलिक अॅसिड आणि अँटिऑक्सिडंट्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा

* हे पोषक घटक स्त्रीबीज आणि शुक्राणूंची गुणवत्ता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

2. कॅफिनचे सेवन मर्यादित करा

* कॅफिनचे अधिक सेवन हे प्रजनन क्षमता कमी करते

काय खबरदारी घ्याल?

* कॅफिनयुक्त पेयांचे सेवन मर्यादीत करा(दिवासातून अंदाजे एक छोटा कप कॉफी). हळूहळू प्रमाण कमी करत आठवड्यातून एकदा कॅफिनयुक्त पेयांचे सेवन करण्याचा प्रयत्न करा.

* कॅफिनच्या सेवनाबद्दल वैयक्तीक सल्ल्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

3. वजन नियंत्रित राखा

* जास्त वजन किंवा कमी वजन हार्मोन्सच्या पातळीत व्यत्यय आणू शकते आणि प्रजनन क्षमता कमी करू शकते.

वजन नियंत्रित राखण्याचे काय आहेत फायदे?

* जास्त वजन महिलांमधील ओव्हुलेशन प्रक्रियेमध्ये व्यत्यय आणू शकते आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता कमी करू शकते.

* कमी वजनाच्या व्यक्तींमध्ये मासिक पाळी अनियमित होऊ शकते आणि स्त्रीबीज उत्पादन कमी होऊ शकते.

वजन कमी करण्यासाठी टिप्स

* चालणे, योगा करणे किंवा पोहणे यासारखे व्यायाम पर्याय निवडा.

* तुमच्या शरीराला पुरत उष्मांकाच्या गरजांनुसार संतुलित आहार घ्या.

4. धूम्रपान आणि मद्यपान टाळा

* ते स्रीबीजाची गुणवत्ता कमी  करू शकते आणि हार्मोन्सवर परिणाम करते

* पुरुषांमध्ये या सवयी शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता कमी करतात.

 गर्भधारणेचा प्रयत्न करण्यापूर्वी धूम्रपान आणि मद्यपान सोडल्याने प्रजनन क्षमता सुधारते.

5. प्रक्रिया केलेले आणि शर्करायुक्त पदार्थ टाळा

* प्रक्रिया केलेले आणि साखरयुक्त पदार्थ हार्मोनल असंतुलन निर्माण करू शकतात, ज्यामुळे प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

* पॅकेज्ड फुड, सोडा आणि जंक फूडचे सेवन टाळा. शक्य असेल तेव्हा ताजे, घरी शिजवलेले जेवण.

6. तणावाचे व्यवस्थापन करा

* दीर्घकालीन तणावान् हार्मोन्सच्या पातळीत व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो.

* योग, ध्यान किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम करा.छंद जोपासा.तणाव व्यवस्थापित करण्यासाठी समुपदेशन किंवा थेरपीचा पर्याय निवडा.

गर्भधारणेपुर्वी संतुलित आहाराचे सेवन करणे, निरोगी वजन राखणे आणि धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या हानिकारक सवयी टाळणे निरोगी गर्भधारणेस नक्कीच मदत करेल.प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगवेगळ्या असू शकतात म्हणून योग्य मार्गदर्शनासाठी प्रजनन तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Cervical Health Awareness Month 2025 : निरोगी गर्भधारणेसाठी गर्भाशय निरोगी असणं गरजेचं; डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॉलो करा 'या' टिप्स

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Sanjay Raut : हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Sanjay Raut : हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack : वांद्रेतील तीन घटनांचा उल्लेख, मुंबईत दहशतीचा प्रयत्न, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
सर्व घटना वांद्रेमध्येच का? सैफ अली खानवर हल्ला हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रकार : प्रियांका चतुर्वेदी
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Embed widget