एक्स्प्लोर

Health: काय सांगता! फक्त आहारामुळेच नाही, तर थायरॉईडमुळेही 'बद्धकोष्ठता' होते? नेमके शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ सांगतात...

Health: तज्ज्ञांच्या मते, थायरॉईडचे योग्य नियंत्रण न झाल्यास त्याचा थेट तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊन दीर्घकालीन बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते.

Health: आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत अनेकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो, त्यापैकी बद्धकोष्ठतेचा त्रास हा बऱ्याचदा केवळ आहार किंवा जीवनशैलीशी संबंधित असल्याचे समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, तज्ज्ञांच्या मते थायरॉईडचे योग्य नियंत्रण न झाल्यास त्याचा थेट तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊन दीर्घकालीन बद्धकोष्ठतेची (Health News) समस्या उद्भवू शकते. विशेषतः हायपोथायरॉईडीझम हा आज सर्वाधिक आढळणाऱ्या हार्मोनल विकारांपैकी एक असून तो आतड्यांच्या हालचाली मंदावतो. याबाबत चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीस्ट डॉ. मेघराज इंगळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

बद्धकोष्ठतेस थायरॉईड कारणीभूत असू शकतो? (Thyroid)

डॉ. मेघराज इंगळे सांगतात की, हायपोथायरॉईडीझममध्ये शरीराचा एकूण चयापचय दर कमी होतो. थायरॉईड संप्रेरके आतड्यांच्या हालचाली नियंत्रित करतात. ही पातळी कमी झाली की आतड्यांची गती मंदावते आणि बद्धकोष्ठता ही त्यातील सर्वात सामान्य आणि सातत्याने दिसणारे लक्षण आहे. बद्धकोष्ठतेच्या तपासणीत अनेकदा थायरॉईड चाचणीकडे दुर्लक्ष केले जाते.

बद्धकोष्ठतेचे लक्षणं काय?

मुंबईतील 38 वर्षीय पायल वोरा (नाव बदलले आहे) ज्या व्यवसायाने एक कलाकार आहेत. त्या गेल्या एक वर्षाहून अधिक काळापासून तीव्र बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रासल्या होत्या. त्यांना आठवड्यातून केवळ दोन वेळाच मलविसर्जन होत असल्याने प्रवासादरम्यान त्यांना प्रचंड अडचणी येत होत्या. थकवा जाणवणे, 8 ते 10 किलो वजनवाढ, कोरडी त्वचा, चिडचिड, मूड स्विंग्स अशी लक्षणं असूनही ती कामाच्या ताणामुळे असल्याचे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. सविस्तर तपासणीत त्यांना हायपोथायरॉईडीझमचे निदान झाले. थायरॉईड औषधं, फायबरयुक्त आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रित राखणे आणि मेडिटेशनने तणावाची पातळी  कमी केल्यानंतर 2–3 महिन्यांत त्यांच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा झाली. आठवड्यातून 3 ते 4 वेळा नियमित मलविसर्जन होऊ लागले, सुमारे 6 किलो वजन घटले आणि त्या आत्मविश्वासाने त्यांच्या कला प्रदर्शनांसाठी प्रवास करू लागल्या आहेत.

थायरॉईड आणि पचनसंस्था यांचा जवळचा संबंध

थायरॉईड ग्रंथी शरीरातील चयापचय नियंत्रित करते आणि त्याचा थेट परिणाम गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (GI) मार्गावर होतो. थायरॉईड संप्रेरके आतड्यांमधून अन्न पुढे ढकलणाऱ्या स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करतात. संप्रेरकांची पातळी कमी झाली की या हालचाली मंदावतात आणि आतड्यांच्या सवयी अनियमित होतात.

हायपोथायरॉईडीझममध्ये दिसणारी बद्धकोष्ठतेची लक्षणे

  • आठवड्यातून 3 पेक्षा कमी वेळा मलविसर्जन
  • कोरडे व कठीण मल
  • मलविसर्जन करताना वेदना व जास्त ताण
  • पोटदुखी, पेटके, फुगणे
  • मळमळ, अपूर्ण मलविसर्जनाची भावना

डॉ. इंगळे पुढे सांगतात की, अनेक प्रकरणांमध्ये बद्धकोष्ठता हे हायपोथायरॉईडीझमचे सुरुवातीचे किंवा दिर्घकाळ टिकणारे लक्षण असते.

थायरॉईड तपासणी का चुकते?

बद्धकोष्ठतेला अनेकदा जीवनशैलीशी संबंधित समस्या मानली जाते. त्यामुळे हार्मोनल समस्यांचा विचार न करता फायबर सप्लिमेंट्स किंवा आहारातील बदलांद्वारे उपचार केले जातात. परिणामी, मूळ कारण असलेला हायपोथायरॉईडीझम मात्र लक्षात येत नाही आणि रुग्ण दीर्घकाळ त्रस्त राहतो.

वेळीच तपासणी आवश्यक

तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ चालणाऱ्या किंवा उपचारांना प्रतिसाद न देणाऱ्या बद्धकोष्ठतेत टीएसएच आणि फ्री टी4 या रक्तचाचण्या करून थायरॉईडचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे. योग्य निदानानंतर थायरॉईडची औषधं आणि जीवनशैलीतील बदल केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर करता येऊ शकते. बद्धकोष्ठता ही केवळ एक साधी पचनाची समस्या नसून ती थायरॉईडच्या समस्येचा इशाराही असू शकते. त्यामुळे बद्धकोष्ठता दीर्घकाळ टिकून राहिल्यास किंवा नेहमीच्या उपचारांनी ती बरी होत नसेल, तर थायरॉईड तपासणी करून घेणे गरजेचे आहे. वेळेवर निदान आणि योग्य उपचारांनी पचनसंस्था व संपुर्ण आरोग्य सुधारता येऊ शकते.

हेही वाचा

Health : सर्दी-खोकला झाल्यावर ब्रँडी किंवा रम पिणे खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara : शाळेच्या भीतीने 12 वर्षीय विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने 12 वर्षीय विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : शाळेच्या भीतीने 12 वर्षीय विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने 12 वर्षीय विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
Embed widget