Detox Body Naturally: फिट अन् हेल्दी राहण्यासाठी शरीर डिटॉक्स करणं अत्यंत गरजेचं; पण कसं? फायदे काय?
काहीवेळा आपण अन्न, औषधं आणि अल्कोहोल यामधून इतके विषारी पदार्थ शरीरात जमा करतो की, हे अवयव देखील सुस्त होतात. यामुळे शरीराच्या संपूर्ण कार्यावर परिणाम होतो.
![Detox Body Naturally: फिट अन् हेल्दी राहण्यासाठी शरीर डिटॉक्स करणं अत्यंत गरजेचं; पण कसं? फायदे काय? healthy lifestyle and nutrition to detox body detoxification tips health and lifestyle Know All Updates Detox Body Naturally: फिट अन् हेल्दी राहण्यासाठी शरीर डिटॉक्स करणं अत्यंत गरजेचं; पण कसं? फायदे काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/13/221037c33ce1839423c895af814ae38f1707835472285701_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Detox Body Naturally: धावपळीची जीवनशैली (Stressful Lifestyle) आणि चुकीची आहार पद्धती (Wrong Diet) यांमुळे आपल्यापैकी अनेकांना शरीराच्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. शरीराची आपण सर्वचजण काळजी घेतो, जसं शरीराचं बाह्यअंग स्वच्छ आणि निरोगी असणं आवश्यक आहे. तसंच, शरीर आतून निरोगी असणंही तेवढंच गरजेचं आहे.
काहीवेळा आपण अन्न, औषधं आणि अल्कोहोल यामधून इतके विषारी पदार्थ शरीरात जमा करतो की, हे अवयव देखील सुस्त होतात. यामुळे शरीराच्या संपूर्ण कार्यावर परिणाम होतो. त्यामुळे आपण वेळोवेळी शरीराला डिटॉक्स करत राहायला हवं. शरीर डिटॉक्स करण्यासाठी विविध डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया आहेत. ज्यामध्ये अल्कोहोल डिटॉक्सिफिकेशन, ड्रग डिटॉक्सिफिकेशन आणि डायलिसिसद्वारे किडनी फेल झालेल्या लोकांच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन केलं जातं. जर तुम्हाला कोणताही आजार नसेल, तर तुम्ही घरच्या घरी नैसर्गिकरित्या तुमचं शरीर डिटॉक्स करू शकता.
शरीर डिटॉक्स करणं कशासाठी आवश्यक? (Why Is It Necessary to Detox The Body?
तुमच्या शरीराला डिटॉक्सिफाय केल्यानं तुम्ही उत्साही बनता, तुमची त्वचा तजेलदार राहते, तुम्हाला काम करताना थकवा जाणवत नाही, अशक्तपणाही येत नाही आणि तुम्ही निरोगी राहता. विष्ठा, लघवी, घाम, किडनी, यकृत शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. यामुळे शरीरातील सूजही कमी होते.
नैसर्गिकरित्या आपलं शरीर कसं डिटॉक्स करावं? (How To Detox Your Body Naturally?)
शरीर डिटॉक्स करण्यासाठी साखरेचं सेवन कमी करा. साधे कार्बोहायड्रेट, कृत्रिम साखर, अल्कोहोल किंवा कार्बोनेटेड पेय किंवा गोड पेय टाळा. पॅकेज्ड अन्न, जंक फूड, बाहेरचे पदार्थ खाणं टाळा. ट्रान्स फॅट, तळलेलं अन्न आणि मॉडिफाइड फूड खाणं टाळा.
शरीर डिटॉक्स करण्याचे उपाय (Remedies to Detox The Body)
आपल्या आहारात जास्तीत जास्त फळं, भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थ खा. हिरव्या पालेभाज्या खा आणि दिवसभर भरपूर पाणी प्या. तसेच, लिक्विड डाएट घ्या. दिवसातून एक ते दोन ग्रीन टी प्या. चहा, कॉफी किंवा इतर कॅफिनयुक्त पदार्थांचं सेवन टाळा. आठवड्यातून एक दिवस उपवास ठेवा, ज्यामध्ये तुम्ही फक्त पाणी प्या किंवा फळं खा.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)