एक्स्प्लोर

Long Life Secret: 100 वर्षांचं दीर्घायुष्य जगण्यासाठी 'ही' एकच गोष्ट आवश्यक; 93 वर्षांच्या वृद्धानं गुपित सांगितलं

Long Life Secret: जगात असे अनेक लोकही आहेत, ज्यांचं वय 90 ते 100 वर्षांपेक्षा जास्त आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्यांचं वय 93 वर्ष आहे आणि काही काळापासून चर्चेचा केंद्रबिंदू आहेत.

Long Life Secret: सध्याचं युग तंत्रज्ञानाचं युग (Age of Technology) आहे, असं म्हटलं जातं. अन्न, वस्त्र, निवाऱ्याप्रमाणेच आता गॅजेट्स ही माणसाची अत्यंत महत्त्वाची मुलभूक गरज झाल्याचं गमतीनं बोललं जातं. त्यातच धकाधकीची जीवनशैली (Stressful Lifestyle), चुकीची आहारपद्धती (Wrong Diet) यांमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो. जगभर तंत्रज्ञानाचा प्रसार होत असल्यानं लोकांना निरोगी आणि दीर्घायुष्य जगणं कठीण होत चाललं आहे. दरम्यान, जगात असे अनेक लोकही आहेत, ज्यांचं वय 90 ते 100 वर्षांपेक्षा जास्त आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्यांचं वय 93 वर्ष आहे आणि काही काळापासून चर्चेचा केंद्रबिंदू आहेत. त्याचं कारण म्हणजे, वयाच्या 93 व्या वर्षी रिचर्ड मॉर्गन (Richard Morgan) त्यांच्या अर्ध्या वयाच्या व्यक्तीएवढे फिट आहेत.

93 वर्षीय रिचर्ड यांनी सांगितलं दीर्घायुषी होण्याचं गुपित  

आयर्लंडचे रहिवासी असलेल्या रिचर्ड यांच्या फिटनेसवर संशोधन करण्यात आलं आहे. जे गेल्या महिन्यात जर्नल ऑफ अप्लाइड फिजियोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालं होतं. यामध्ये त्यांचा आहार, शारीरिक हालचाली, व्यायाम आणि एकूणच आरोग्यावर भर देण्यात आला होता. व्यवसायानं बेकर असलेल्या रिचर्ड यांनी आपल्या संशोधनात सांगितलं की, वयाच्या 73 व्या वर्षी नियमित व्यायाम सुरू होईपर्यंत त्यांनी खेळात कधीच रस घेतला नव्हता. तसेच, आरोग्याकडे फारसं लक्षंही दिलं नव्हतं. 

त्यांच्याहून अर्ध्या वयाच्या लोकांना टाकलं मागे 

रिचर्ड यांनी 'वॉशिंग्टन पोस्ट'ला स्वतःच्या रुटीनबाबत सांगितलं, त्यांच्या व्यायामाच्या दिनचर्येबद्दलही सांगितलं. एक दिवस त्यांना अचनाक जाणवलं की, हेल्दी रुटीन आणि डाएट फॉलो केल्यानं खूप मजा येते. 

इट्स नेवर टू लेट 

रिचर्ड यांना काही अनुवांशिक फायदे असू शकतात, असं संशोधकांचं म्हणणं आहे. असं असलं तरी, त्यांच्या फिटनेसचं खरं गुपित 73व्या वर्षी सुरू केलेल्या दिनचर्येशी संबंधित आहे. त्यामुळे तुमचं वय कितीही असलं तरी तुम्ही व्यायामाला सुरुवात करू शकता आणि रिचर्ड मॉर्गनसारखा हाय प्रोटीन असलेला आहार घेतल्यास तुम्हीही त्यांच्याप्रमाणे तंदुरुस्त राहू शकतात. 

'या' टिप्स आणि ट्रिक्स ठरतील फायदेशीर 

  • सर्वात आधी कोणताही, तुम्हाला जमेल तो एक्सरसाईज प्रोग्राम सुरू करा, पण त्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. 
  • लो इंटेसिटी असलेल्या एक्सरसाईज करायला सुरुवात करा आणि हळूहळू हाय इंटेसिटी एक्टिविटीजवर लक्ष द्या. 
  • एरोबिक एक्सरसाईज जसं की, स्विमिंग करणं आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये समावेश करणं. 
  • आपल्या शरीराचं ऐका, वेदना आणि समस्यांसंबंधित कोणत्याही लक्षणावर लक्ष द्या. 
  • हायड्रेट राहा आणि संतुलित आहार घ्या. 
  • सांध्यांच्या गतिशिलतेत सुधारणा आणि दुखापत कमी करण्यासाठी व्यायामांचा समावेश करा. 
  • बराच काळ एक्सरसाइज करण्यासाठी अशा अॅक्टिव्हिटीज निवडा, ज्यामध्ये तुम्हाला आनंद वाटतो. 

काय करू नये?

स्वतःवर जास्त ताण घेऊ नका. विशेषत: सुरुवातीला, जेवढं झेपतंय तेवढाच व्यायाम आणि डाएट करा. जर तुम्हाला सांधेदुखीची समस्या असेल, तर जास्त हेव्ही वर्कआउट करणं टाळा. तुमचं शरीरी सुदृढ करण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारची दुखापत टाळण्यासाठी सर्वात आधी वॉर्म अप करा. जर एखादी दुखापत झाली किंवा बरं वाटत नसेल, तर व्यायाम करणं टाळा. सतत अस्वस्थ वाटत असेल, तर प्रशिक्षक किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या. तुमच्या एक्सरसाईज रुटिनमध्ये एखादा दिवस ब्रेक घ्या. 

तुमच्या शरीराला बरं होण्यासाठी आणि नव्या दिनचर्येशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो. डाएटवरही कंट्रोल ठेवा. कॅलरीजपासून अंतर ठेवा. संतुलित, पौष्टिक आहारावर लक्ष केंद्रित करा. व्यायाम करताना तुमची शारीरिक क्षमता आणि तुम्हाला असलेल्या आरोग्याच्या समस्या यांवरुनच तुमच्या व्यायामाचं रुटीन ठरवा. 

(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

हाताला वेदना, बोटाला सूज; लक्षणं साधी, पण संकेत मोठे, हार्ट अटॅकचा धोका, काय कराल?

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेटUddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहनMCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
Embed widget