Coronavirus : सावधान! कोरोना विषाणू करतोय मेंदूवर परिणाम, 'या' गंभीर आजारांचा धोका
Post Covid19 Effect : कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये मेंदू संबंधित आजार झाल्याचं समोर आलं आहे. एका अभ्यासानुसार, कोरोना विषाणू मेंदूवर परिणाम करतो यामुळे रुग्णांमध्ये नैराश्य आणि तणाव अशा समस्या वाढत आहेत.
Corona Treatment : कोरोना विषाणूने ( Coronavirus ) मागील दोन वर्षांपासून देशासह जगभरात कहर माजवला आहे. कोरोना विषाणू त्याचे डेल्टा ( Delta ) आणि ओमायक्रॉन ( Omicron ) हे व्हेरियंट यामुळे हजारो रुग्णांना आपले प्राण गमावले. भारतातही अनेक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता पुन्हा एकदा कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. एकीकडे कोरोनाचा धोका कायम असताना, दुसरीकडे कोरोना विषाणू संदर्भात चिंताजनक माहिती समोर आली आहे. एका अभ्यासानुसार, कोरोना विषाणू मेंदूवर परिणाम करतो, यामुळे रुग्णांना मेंदू संबंधित अनेक आजारांचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे.
कोरोना विषाणू करतोय मेंदूवर परिणाम
एका संशोधनामध्ये पोस्ट कोविड इफेक्ट संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. कोरोना होऊ गेल्यानंतर रुग्णाच्या शरीरात कोणते बदल होतात आणि याचा शरीरावर काय परिणाम होतो, याचा या संशोधनात अभ्यास करण्यात आला. यामध्ये चिंताजनक बाब समोर आली आहे. अभ्यासानुसार, कोरोना विषाणूमुळे रुग्णांच्या मेंदूवर परिणाम होतो. कोरोना विषाणू रुग्णाच्या मेंदूमध्ये काही छोटे बदल होतात. त्यामुळे लोक अनेक आजारांना बळी पडत आहेत. डॉक्टरांच्या मते, कोविड विषाणूला रोखण्यासाठी त्याच्या प्रोटोकॉलचे पालन करणं आवश्यक आहे.
कोरोनामुळे मेंदूमध्ये छोटे बदल
नवीन अभ्यासात असं समोर आलं आहे की, कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर दीर्घकाळात मेंदूमध्ये अनेक बदल घडवून आणू शकतो. रेडिओलॉजिकल सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिकेच्या (RSNA)संशोधकांनी पोस्ट कोविड परिणाम जाणून घेण्यासाठी विशेष MRI मशीनचा वापर केला. त्यानंतर धक्कादायक निकाल समोर आला. या प्रकारच्या इमेजिंग मशीनचा वापर मायक्रोब्लीड्स, ब्रेन ट्यूमर आणि स्ट्रोक यासारख्या अनेक न्यूरोलॉजिक परिस्थिती शोधण्यासाठी देखील केला जातो, असं संशोधकांनी सांगितलं.
नैराश्य आणि चिंतेचं प्रमाण
या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी कोरोनामधून बरे झालेल्या 46 रुग्ण आणि 30 निरोगी लोकांवर अभ्यास केला. यामध्ये लोकांच्या मेंदूचे स्कॅनिंग करण्यात आलं. यामध्ये पोस्ट कोविड रुग्णांमध्ये चिंता, निद्रानाश, नैराश्य, डोकेदुखी आणि इतर मानसिक आजार दिसून आले. कोविडमधून बरे झाल्यानंतर लोकांना अशा प्रकारच्या समस्या जाणवत होत्या.
कोविड काळात जन्मलेल्या बाळांना बोलण्यात अडचण
दरम्यान, दुसऱ्या एका संशोधनानुसार, कोविड काळात जन्मलेल्या बाळांवरही कोरोनाचा परिणाम झाला आहे. या अभ्यासानुसार, कोविड काळात जन्मलेलं बाळाचं संवाद कौशल्य ( Communication Skill ) खूपच कमकुवत होतं. यामुळे कोविड काळात जन्मलेल्या बाळांना बोलण्यात अडचणी येत होत्या. या संशोधनात आढळलं की, कोरोना काळात जन्मलेल्या बाळामध्ये मज्जासंस्थेचा विकास संथपणे झाला. त्यामुळे याचा परिणाम त्यांच्या बोलण्याच्या क्षमतेवर झाला.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )