Majha Katta : कॅन्सर नेमका का होतो? कॅन्सरवर उपाय काय? प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुलोचना गवांदे माझा कट्ट्यावर
दारु पिणं हे धोकादायक आहे. दारु पिण्यामुळं कॅन्सर होतो. दारुमुळं तो फक्त लिव्हरचाच कॅन्सर होत नाहीतर आतड्याचा, अन्न नलिकेचाही कॅन्सर होतो, असे मत प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुलोचना गवांदे यांनी व्यक्त केलं.
Majha Katta DR. Sulochana Gawande : आपल्या शरीरात असंख्य पेशी असतात. त्यातीलच एक पेशी म्हणजे कॅन्सर. कॅन्सर काही बाहेरुन आलेला नसतो. ती आपल्याच शरीरातील पेशी असते असे मत प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुलोचना गवांदे (DR. Sulochana Gawande) यांनी व्यक्त केलं. डॉ. सुलोचना गवांदे या एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी कॅन्सर आजाराबद्दल सविस्तर माहिती दिली. कॅन्सरमध्ये एका पेशीवर वारंवार हल्ला होतो. हा हल्ला होण्याला वेगवेगळी कारणे आहेत. उदाहरणार्थ सिगारेट ओढणाऱ्या लोकांना फुफुसाचा कॅन्सर होतो. कारण सिगारेटचा धूर डायरेक्ट फुफुसात जातो. पेशींवर होणारा कोणताही हल्ला सातत्यानं झाला तर जनुकात बदल होतो आणि कर्करोग होतो असे सुलोचना गवांदे म्हणाल्या. नवीन संशोधनात असेही दिसले आहे की जाडेपणा हासुद्धा कर्करोगाला आमंत्रण देऊ शकतो असे गवांडे म्हणाल्या.
दारुमुळं कॅन्सर होतो का?
दारु पिणं हे धोकादायक आहे. दारु पिण्यामुळं कॅन्सर होतो. दारुमुळं तो फक्त लिव्हरचाच कॅन्सर होत नाहीतर आतड्याचा, अन्न नलिकेचाही कॅन्सर होतो, असे मत प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुलोचना गवांदे (DR. Sulochana Gawande) यांनी व्यक्त केलं. जाडेपणा हा देखील कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरु शकतो. शरीरात तयार झालेल्या मेदाच्या पेशी असतात त्या काहीतरी हार्मोन्स तयार करत असतात. उदाहरणार्थ गर्भाशयात या पेशी वेगानं जात असल्याचे गवांदे म्हणाल्या. अलिकडे लठ्ठपणा आणि कर्करोग याचा जवळचा संबंध येऊ लागला आहे.
कॅन्सरवर प्रभावी औषध काय?
कॅन्सर हा अनुवंशीक नसतो. अनुवंशीक या जीन्स असतात असे डॉ. सुलोचना गवांदे म्हणाल्या. कॅन्सर झाल्यावर त्यातून बाहेर पडायचा मार्ग कठीण आहे. त्यामुळं आधीच शक्यतो काळजी घेणं गरजेचं असल्याचे मत सुलोचना गवांदे यांनी व्यक्त केलं. कधी कोणत्या पेशीमुळं कॅन्सर सुरु झाला हे समजत नाही. ज्या प्रोटीनमुळं कॅन्सर होतो, त्यावर संशोधनातून एक औषध तयार केलं. imatinib असे या औषधाचे नाव आहे. या गोळीमुळं कॅन्सर बरा होण्याचं प्रमाण अधिक असल्याचं संशोधनातून पुढे आल्याची माहिती सुलोचना गवांदे यांनी दिली. या गोळीमुळं पेशंट उत्तम प्रकारचे आयुष्य जगू शकतात असे सुलोचना गवांदे म्हणाल्या.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )