Mrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचार
Mrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचार
साताऱ्यातील छत्रपती घराण्यातील चौथी पिढी प्रचारासाठी फील्डमधे भाजपचे उमेदवार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची कन्या प्रचारासाठी मैदानात. छत्रपती मृणालीराजे साताऱ्यातील मंडईत सकाळी सकाळी प्रचाराला उतरल्या
हे ही वाचा...
मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) लढवणार अशी घोषणा केली होती. मात्र त्यानंतर निवडणूक न लढवता पाडापाडी करणार असल्याची भूमिका जाहीर केली. यावर राज ठाकरे यांनी तुम्ही आरक्षण कसं मिळवून देणार?, येवढं मला सांगा असं सवाल उपस्थित केला होता. राज ठाकरेंच्या या विधानावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे दुपारपर्यंत झोपेतच राहतात. त्यामुळे त्यांचा मेळ लागत नाही. आम्ही तुम्हाला विरोधक मानत नाही, मग तु्म्ही पण बोलू नका. मी तुम्हाला हे समजावून सांगतोय, असं मनोज जरांगे म्हणाले. मराठ्यांचा खूप मोठा वर्ग तुम्हाला मानतो. तुम्हाला मानणारा मोठा वर्ग आहे. तुम्ही नाराजी ओढावून घेऊन नका. तुम्ही आमच्या लफड्यात पडू नका. मराठा समाजाचं कसं अस्तित्व वाढवायचं हे मला माहिती आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.