Basil Seeds Benefit : तुळशीच्या पानांपेक्षा बियाही गुणकारी; प्रोटीन, फायबर, आर्यनचा भरपूर खजाना
तुळस (Basil) आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. आयुर्वेदातही तुळशीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत.
Basil Seeds Benefit : तुळस (Basil) आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. आयुर्वेदातही तुळशीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. घरात तुळशीचं रोप लावणं अत्यंत फायदेशीर ठरतं, कारण तुळस अनेक आरोग्याच्या समस्यांवर फायदेशीर ठरते. अॅन्टी-बॅक्टेरियल तुळस डेंग्यू, व्हायरल फिवरपासून त्वचेच्या समस्यांवरही फायदेशीर ठरते. तुळशीच्या मुळांपासून तुळशीच्या बियांपर्यंत सर्व गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तुळशीच्या बियांमध्ये प्रोटीन, फायबर आणि लोह असते. तुळशीच्या बियांना मंजिरी असं देखील म्हणले जाते. जाणून घेऊयात तुळशीच्या बियांचे फायदे-
1. इम्यूनिटी वाढते- तुळशीच्या बियांमध्ये अँटी- ऑक्सीडेंट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रोज सकाळी तुळशीच्या बिया खाव्यात. तुळशीच्या बियांमध्ये फ्लॅवोनोइड्स आणि फेनोलिक असते. ज्यामुळे शरीराची रोग प्रतिकात्मक शक्ती वाढते. सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर तुळशीच्या बियांचा काढा प्या. तसेच तुम्ही तुळशीच्या बिया चहामध्ये टाकून देखील पिऊ शकता.
2. पोटदुखी कमी होते- तुळशीच्या बिया खाल्याने पचन क्रिया सुधारते. तुम्हाला जर अॅसिडीटी किंवा अपचन होत असेल तर तुम्ही तुळशीच्या बिया खाल्ल्या पाहिजेत. एक ग्लास पाण्यामध्ये तुळसीच्या बिया टाका. पाण्यामध्ये टाकल्यावर या बिया मोठ्या होतात. हे पाणी प्यायल्याने पोटदुखी कमी होते.
3. वजन कमी होते- तुळशीच्या बिया खाल्ल्याने वजन कमी होते. या बियांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. तसेच फायबर या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तुळशीच्या बिया खाल्ल्याने तुम्हाला भूक लागत नाही. तुळशीच्या ग्रीन टीमध्ये टाकून तुम्ही पिऊ शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Weight Loss: नाश्ता करताना 'या' चुका टाळा, अन्यथा लठ्ठपणाचे व्हाल शिकार