EID Special 2022 : ईदच्या खास मुहूर्तावर पाहुण्यांसाठी घरच्या घरी बनवा खजूर मिल्क शेक; ही घ्या साहित्य आणि कृती
EID Special 2022 : खजूर जेवढे खायला स्वादिष्ट असतात तेवढेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. त्यामुळे आपली पचनक्रिया मजबूत राहण्यास मदत होते.
EID Special 2022 : ईदच्या सणाला अवघे काही दिवस बाकी आहेत. या निमित्ताने मुस्लिम बांधवांची ईदीसाठी जय्यत तयारी पाहायला मिळते. रमजानच्या खास प्रसंगी खजूरांचा सर्वाधिक वापर केला जातो. ज्यांनी रोजा केला आहे ते तर खजूर खाल्ल्यानंतरच उपवास सोडतात. अशा वेळी उन्हाळ्यात तुम्हीसुद्धा घरी येणाऱ्या पाहुण्यांना खास पेय देण्यासाठी खजूर मिल्क शेक देऊ शकता.
खजूर जेवढे खायला स्वादिष्ट असतात तेवढेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. त्यामुळे आपली पचनक्रिया मजबूत राहण्यास मदत होते. यासोबतच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. तसेच शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होते. यासोबतच मेंदूच्या आरोग्यासाठीही खजूर खूप फायदेशीर मानले जातात. ईदच्या निमित्ताने घरी येणाऱ्या पाहुण्यांना पेय देण्यासाठी खजूर मिल्क शेकची सोपी साहित्य आणि कृती जाणून घ्या.
खजूर मिल्कशेक बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
15 खजूर
3 चमचे मध
अर्धा लिटर दूध
50 ग्रॅम नारळ
खजूर मिल्क शेक बनविण्याची सोपी पद्धत :
- ईदच्या खास मुहूर्तावर खजूर मिल्क शेक बनवण्यासाठी आधी खजूर घ्या आणि त्याच्या सर्व बिया काढून घ्या.
- यानंतर खजूर धुवून थोडावेळ दुधात भिजवून ठेवा.
- खजूर दुधात किमान 2 तास भिजवून नंतर ब्लेंडरमध्ये ठेवा.
- दुधात खजूर ठेवल्याने ते मऊ होतात.
- खजुराबरोबर मध आणि दूध घालून ब्लेंडर चालवा.
- आता तुमचा खजूर मिल्क शेक तयार आहे.
- फ्रीजमध्ये 2 ते 3 तास ठेवा. त्यात नारळ टाका.
- थंड झाल्यावर पाहुण्यांना सर्व्ह करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :