(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lemon Benefits : छोट्याशा लिंबाचे गुणकारी फायदे, अनेक रोगांवरही रामबाण उपाय!
Lemon Benefits : लिंबूमध्ये जीवनसत्त्वे ए, बी आणि सी भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय त्यात पोटॅशियम, लोह, सोडियम, मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फरस देखील असतात.
Lemon Benefits : उन्हाळ्याच्या काळात तीव्र उष्णतेपासून वाचण्यासाठी आणि उन्हाच्या तडाख्याला शांत करण्यासाठी दररोज किमान एक ग्लास लिंबूपाणी (Lemonade) प्यावे. लिंबू शरीरातील क्षार आणि पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करते. जेव्हा तुम्हाला औषधाच्या स्वरूपात लिंबू वापरण्याचा सल्ला दिला जातो, तेव्हा तुम्ही नेहमीच्या वापरतील लिंबूच वापरावा.
लिंबूमध्ये जीवनसत्त्वे ए, बी आणि सी भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय त्यात पोटॅशियम, लोह, सोडियम, मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फरस आणि क्लोरीन घटक, प्रथिने, चरबी आणि कर्बोदके देखील पुरेशा प्रमाणात असतात. हे सर्व घटक निरोगी शरीरासाठी फायदेशीर आहेत.
लिंबाचे गुणकारी फायदे:
- जास्त तहान लागल्यास : एका ग्लास पाण्यात अर्धा किंवा एक लिंबू पिळून घ्या आणि 3 चमचे साखर आणि पाव चमचा मीठ मिसळून प्या. हे पाणी घोट घोट प्या, एका श्वासात पिऊ नका. असे केल्याने जास्त तहान लागण्याची समस्या आटोक्यात येते.
- डिहायड्रेशन : एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून घ्या, त्यात पाव चमचा मीठ घाला आणि थोडी भाजलेली जिरे पावडर घाला. हे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा पिऊ शकता. यामुळे शरीरातील पाणी आणि पोषक तत्वांची कमतरता दूर होते.
- चरबी कमी करण्यासाठी : एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळा. ते पाणी प्या. या पद्धतीचा अवलंब सकाळी रिकाम्या पोटी करावा. यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
- भूक वाढवण्यासाठी : अर्धे लिंबू घेऊन त्यावर काळे मीठ टाकून चाटल्याने पचनक्रिया सुरळीत होऊन भूक वाढण्यास मदत होते.
- पोटदुखी दूर करण्यासाठी : लिंबाचा रस काढून त्याची साल बारीक करून कोमट पाण्यासोबत सेवन करा. पोटदुखी दूर होण्यास मदत होते.
- उलटीची समस्या असल्यास : जेवण खाल्ल्यानंतर मळमळ आणि उलटीची समस्या होत असल्यास ताजा लिंबाचा रस घ्या. एक ते दोन चमचे रस पिणे पुरेसे आहे, त्याने त्वरित परिणाम दिसेल.
- पोटातील जंत दूर करण्यासाठी : लिंबाची पाने बारीक करून त्याचा रस काढा आणि त्याचे सेवन करा. एका वेळी 1 ते 2 चमचे रस पुरेसा आहे. असे केल्याने पोटातील जंत पूर्णपणे साफ होतात.
- अतिसार बरा करण्यासाठी : एक चमचा लिंबाचा रस, दिवसातून 3 ते 4 वेळा घ्या. अतिसाराच्या समस्येत आराम मिळेल.
- कॉलराची समस्या : कॉलराची समस्या म्हणजे उलटी आणि जुलाब एकत्र होत असल्यास काहीही खाण्यापूर्वी एक ते दोन चमचे लिंबाचा रस साखरेसोबत मिसळून घ्या.
- लघवीत जळजळ : काकडीच्या रसात लिंबाचा रस मिसळून सेवन केल्याने लघवीत जळजळ होण्यापासून आराम मिळतो. कापलेल्या काकडीवर काळे मीठ आणि लिंबाचा रस लावून त्याचे सेवन करा, त्याचाही फायदा होईल.
- त्वचेचे आजार बरे करण्यासाठी : लिंबाचा रस मध किंवा बेसनामध्ये मिसळून चेहऱ्यावर लावल्याने डाग, पुरळ आणि खाज या समस्या दूर होतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : टरबूजाच्या बियांमध्ये आहेत अनेक गुणधर्म, जाणून घ्या याचे फायदे
- Health Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )