एक्स्प्लोर

Child Care : वाढत्या वयात मुलांचा आहार कसा असावा? मुलांच्या पोषणाबाबत महत्वाच्या टिप्स जाणून घ्या

Children Health Tips : मुलांमध्ये पोषक आहाराच्या सवयींना प्रोत्साहन दिल्याने शारीरीज ऊर्जेची पातळी सुधारते, मानसिक तसेच शारीरीक विकास, वजन मियंत्रित राखण्यास मदत होते आणि नैराश्य तसेच चिंता कमी होते.

मुंबई : लहान मुलांच्या (Children) आरोग्यावर चुकीच्या आहाराच्या सवयींचा वाईट परिणाम होतो. प्रौढांप्रमाणेच लहान मुलांच्या आहाराची काळजी घेणे जास्त गरजेचं असतं. मुलांमध्ये पोषक आहाराच्या सवयींना प्रोत्साहन दिल्याने शारीरीज ऊर्जेची पातळी सुधारते, मानसिक तसेच शारीरीक विकास, वजन मियंत्रित राखण्यास मदत होते आणि नैराश्य तसेच चिंता कमी होते. याशिवाय, निरोगी खाण्याच्या सवयींमुळे मुलांना भविष्यात लठ्ठपणा, हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि टाइप 2 मधुमेह यांसारख्या अनेक आजारांना प्रतिबंध करण्यास मदत होत. म्हणूनच मुलांमध्ये आरोग्यदायी सवयी लावणं आवश्यक आहे.

मुलांसाठी निरोगी आहाराच्या टिप्स

पुण्यातील बालरोग तज्ज्ञ आणि नवजात शिशु तज्ज्ञ डॉ अतुल पालवे यांनी मुलांच्या पोषणाबाबत काही महत्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.

  • मुलांनी दिवसाची सुरुवात पौष्टिक न्याहारी म्हणजेच ब्रेकफास्टने केली पाहिजे, यामध्ये प्रथिनांचा समावेश असणे महत्त्वाचं आहे. कारण यामुळे तुमच्या मुलाचं पोटं दीर्घकाळ भरलेलं राहून त्यांना ऊर्जा मिळण्यास मदत होते.
  • किशोरवयीन मुलांना वजन व्यवस्थापनात मदत करू शकते. सकाळचे व्यस्त वेळापत्रक पाहता होल-व्हीट ब्रेड, स्मूदीज, दही, एवोकॅडो किंवा पीनट बटर आणि एग सँडविच सारख्या पर्यायांचा न्याहारीत समावेश करता येईल.
  • मुलांना घरातील किराणा खरेदी आणि खाद्यपदार्थ निवडण्यात सहभागी होण्यास प्रोत्साहित करा. 
  • पदार्थांचे पौष्टिक मूल्य समजून घेण्यासाठी लेबल्सचा अर्थ कसा लावायचा याबद्दल शिक्षित करा. जेवण बनवताना त्यांची थोडीफार मदत घेत त्यांना स्वयंपाक घरातील कामात सामील करुन घ्या.
  • घरच्या बागेत फळे, भाजीपाला आणि औषधी वनस्पती लावण्याविषयी मुलांना प्रशिक्षण द्या.
  • निरोगी आहाराच्या सवयी वाढवण्याचा आणि कौटुंबिक संबंध मजबूत करण्यासाठी संपुर्ण कुटुंबियांनी एकत्र जेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे कुटुंबातील संबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळते. 
  • तुमच्या मुलांच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. त्यांच्या खाण्याच्या सवयींचे निरीक्षण करा आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी जेवणाच्या वेळा निश्चित करा. 
  • एकाच वेळी संपूर्ण आहारात बदल न करता मुलाच्या आहारात हळूहळू बदल करा. तुमच्या स्वयंपाकघरातील काही अनहेल्ही पदार्थांऐवजी चांगला पर्याय द्या, हळूहळू अधिक पौष्टिक पर्यायांचा समावेश करा. यामध्ये पांढरा ब्रेड ऐवजी मल्टीग्रेन ब्रेड, बटाटा चिप्स ऐवजी रताळ्याच्या भाजलेले चिप्स, आइस्क्रीम ऐवजी स्मूदी, डेझर्ट किंवा बेकरी पदार्थांच्या जागी घरी तयार केलेले पौष्टीक लाडू तसेच काजू, गूळ आणि खजूर यांचा वापर करा.
  • मुलाने तळलेले पदार्थ खायला न देता ग्रिल केलेले, भाजलेल आणि वाफेवर शिजवलेले  यासारखे पदार्थ खायला द्या आणि मुलांसाठी संतुलित आहाराची निवड करा.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget