Camping Tips: मित्रांसोबत कॅम्पिंगचा प्लॅन करताय? मग, ‘या’ टिप्स खास तुमच्यासाठी...
Travel Tips : थंडीच्या काळात अनेक जण पर्यटनाची योजना आखतात. काही लोक आपल्या कुटुंबासोबत बाहेरगावी फिरण्यास जातात, तर अनेकजण मित्रपरिवारासोबत कॅम्पिंगचा प्लॅन करतात.
Travel Tips : सध्या देशभरात छान थंडीची लाट पसरलीये. शिवाय कोरोनाचे (Corona) निर्बंध काहीसे शिथिल करण्यात आले आहे. अनेक लोक या काळात पर्यटनाच्या योजना आखत आहेत. काहीजण ट्रीपसाठी महाराष्ट्राबाहेर जाण्याची योजना आखत आहेत. तर, काही मात्र आपल्या मित्रपरिवारासोबत एखाद्या तलावाच्या ठिकाणी किंवा डोंगराळ भागात कॅम्पिंगला (Camping) जाण्याचा प्लॅन करत आहेत.
अनेकांना माउंटन बायकिंग, ट्रेकिंग किंवा कॅम्पिंगदेखील आवडते. तुम्ही देखील कॅम्पिंगची प्लॅनिंग करत असाल, तर त्यासाठीही योग्य तयारी असणे देखील आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला कॅम्पिंगशी संबंधित काही खास टिप्स सांगणार आहोत…
तंबू (टेंट)
कॅम्पिंग दरम्यान सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेंट अर्थात तंबू. टेंट निवडताना त्याचे कापड आणि मटेरीयल मजबूत असावे, कारण वेगवेगळ्या ठिकाणी हवामान कसे असेल, हे माहित नसते. त्यामुळे कॅम्पिंग करताना फक्त मजबूत तंबूच उपयुक्त आहेत, म्हणून या टेंट निवडताना तडजोड करू नका.
स्लीपिंग बॅग
मजबूत टेंटनंतर, आपण आपल्यासोबत स्लीपिंग बॅग देखील बाळगली पाहिजे. त्याचा फायदा असा आहे की, यामुळे तुमची रात्र चांगली आणि सुरक्षित जाईल. विशेष म्हणजे त्याचे वजनही जास्त नसते.
खाद्य पदार्थ आणि पिण्याचे पाणी
डोंगराळ भागात आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचल्यानंतर अनेकदा खाण्यापिण्याची कमतरता भासते. कॅम्पिंगला जाण्यापूर्वी, आपल्यासोबत पुरेसे पाणी आणि खाद्यपदार्थांची व्यवस्था ठेवा. तुम्ही बराच काळासाठी कॅम्पिंगला जात असाल, तर थोडेसे स्वयंपाकाचे सामान आणि एक छोटा स्टोव्हदेखील सोबत घ्या.
टॉर्च आणि लायटर
कॅम्पिंग करताना आपल्यासोबत टॉर्च किंवा लायटर असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण कधीकधी या गोष्टी खूप उपयुक्त ठरतात. या गोष्टी सोबत बाळगण्यात कोणतीही अडचण येणार नाही आणि त्या प्रवासातही खूप महत्त्वाच्या ठरतात.
फर्स्टएड बॉक्स
कॅम्पिंग करताना लहानशी प्रथमोपचार पेटी सोबत असणे देखील महत्त्वाचे आहे, कारण, जर तुम्हाला याकाळात दुखापत झाली, तर ती तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते. पिकनिकची योजना आखण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रथमोपचार पेटी तयार करा.
संबंधित बातम्या :
- Covid-19: कोरोनापासून बचाव करण्यासठी जीवनशैलीत 'असा' बदल करा, संसर्ग होणार नाही
- Covid19 : इम्युनिटी वाढवतात 'या' गोष्टी, ओमायक्रॉनपासूनही होईल संरक्षण
- Omicron Variant Alert : ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी 'या' गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, अन्यथा...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha