(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covid-19: कोरोनापासून बचाव करण्यासठी जीवनशैलीत 'असा' बदल करा, संसर्ग होणार नाही
Health Tips : जगभरात कोरोनाचा धोका झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी स्वत:ची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. संसर्ग होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घ्या.
Omicron Variant : जगभरात कोरोनाचा (Covid-19) नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने पुन्हा एकदा आपली दहशत निर्माण केली आहे. कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले लोक ही याला बळी पडत आहेत. त्यामुळे कोविडपासून बचाव करण्यासाठी दररोज स्वत:ची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. संसर्गापासून टाळण्यासाठी काय करावे हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
रोज व्यायाम करा :
रोज योगा आणि व्यायाम करा. श्वसनाचे व्यायाम करा जेणेकरून फुफ्फुसे निरोगी राहतील. दररोज व्यायाम केल्याने ऑक्सिजनची पातळी देखील सुधारते. दररोज 30 मिनिटे चालल्याने जीवनशैलीही सुधारते. तसेच प्रसन्नही वाटते.
जंक फूड खाणे टाळा :
खरंतर जंक फूडचा आणि कोरोनाचा काही संबंध नाही. कारण जंक फूड न खाल्ल्याने कोरोना होऊच शकत नाही असेही सांगता येत नाही. पण, त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती नक्कीच कमकुवत होते आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीवर कोविडचा झटपट हल्ला होतो. त्यामुळे जंक फूड खाणे टाळावे.
हळदीचे दूध :
हळदीचे दूध तुम्हाला कोविडपासून बचाव करण्यासाठी खूप मदत करेल. हळदीच्या दुधात औषधी गुणधर्म असतात. त्यात प्रतिजैविक गुणधर्म आहेत. जे इन्फेक्शनशी लढण्यास मदत करते. त्यामुळे रोज एक ग्लास हळदीचे दूध प्या.
तुळशीची पाने चावा :
तुळशीच्या पानांच्या सेवनाने अनेक आजार दूर होतात. तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. रोज सकाळी तुळशीच्या पानांचे सेवन करावे.
महत्वाच्या बातम्या :
- Covid19 : इम्युनिटी वाढवतात 'या' गोष्टी, ओमायक्रॉनपासूनही होईल संरक्षण
- Omicron Variant Alert : ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी 'या' गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, अन्यथा...
- Health Tips : ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी 'या' भाज्या खा, रोग प्रतिकारशक्ती देखील वाढेल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )