सतत टीव्ही पाहण्याने रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका 35 टक्क्यांनी वाढतो : रिसर्च
शास्त्रज्ञांनी टीव्ही पाहताना ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे.
Bingewatching TV : अनेक लोक दिवसातील कित्येक तास टीव्ही पाहण्यात घालवतात. टीव्हीवरील कार्यक्रम, मालिका तसेच वेगवेगळे शो लोकांना पाहायला आवडतात. जसे वेब सीरिज बिंच व्हॉच केली जाते तसेच टीव्ही देखील अनेक बिंच व्हॉच करत असतात. लोक# शरीरात रक्ताच्या गुठळ्या (blood clots ) होऊ नयेत म्हणून शास्त्रज्ञांनी टीव्ही पाहताना ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे. दररोज चार तास किंवा त्याहून अधिक टीव्ही पाहण्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका 35% वाढतो, असे एका अभ्यासात आढळून आले आहे.
डॉक्टर सेटर कुनटसोर यांनी सांगितले, 'जर तुम्ही सतत टीव्ही पाहात असाल तर तुम्ही काही वेळ ब्रेक घेतला पाहिजे. तुम्ही ब्रेक घेऊन शरीराची हालचाल केली पाहिजे. स्ट्रेचिंग देखील तुम्ही केले पाहिजे. तसेच तुम्ही टीव्ही पाहताना अन हेल्थी स्नॅक्स खाणं देखील टाळलं पाहिजे'
संशोधकांनी या विषयावरील सर्व उपलब्ध प्रकाशित माहिती एकत्रित करण्यासाठी पद्धतशीर पुनरावलोकन केले, त्यानंतर मेटा-विश्लेषण तंत्राचा वापर करून निष्कर्ष एकत्रित केले. 'मेटा-विश्लेषणामध्ये अनेक अभ्यास एकत्र केल्याने एक मोठा नमुना मिळतो आणि वैयक्तिक अभ्यासाच्या निष्कर्षांपेक्षा परिणाम अधिक अचूक आणि विश्वासार्ह बनतो.' असं डॉक्टर कुनटसोर यांनी सांगितलं.
या रिपोर्टसाठी 40 आणि त्याहून अधिक वयाच्या एकूण 131,421 लोकांचा आभ्यास करण्यात आला होता. या लोकांमध्ये दोन गट पाडण्यात आले. एका गटात दीर्घकाळ टिव्ही पाहणारे होते(दररोज किमान चार तास टीव्ही पाहणारे). तर दुसऱ्या गटात क्वचित टीव्ही (दररोज 2.5 तासांपेक्षा कमी टीव्ही पाहणारे) पाहणारे लोक होते.
संबंधित बातम्या
Omicron Variant : सर्दी-खोकला या आजारांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी मध हा सर्वोत्तम उपाय, या पदार्थांसह मध खाल्ल्याने लठ्ठपणा होईल नाहीसा
Health Tips: रोज वर्कआऊट करताय? तर त्याआधी हे सुपरफूड नक्की खा!























