Omicron Variant : सर्दी-खोकला या आजारांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
Omicron Variant : कोविड-19 च्या काळात असा निष्काळजीपणा तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. हा विषाणू श्वसनात, नाक, घसा आणि फुफ्फुसात पसरतो.
Omicron Variant : इतर संक्रमणांच्या तुलनेत हिवाळ्याच्या काळात इन्फ्लूएंझाचा धोका अनेक पटींनी वाढतो. हा आजार इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होतो. जो हिवाळ्यात जास्त सक्रिय असतो. कोविड-19 (Covid-19) च्या काळात असा निष्काळजीपणा तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. हा विषाणू श्वसनमार्ग, नाक, घसा आणि फुफ्फुसात पसरतो. हा एक सामान्य संसर्ग जरी असला तरी याचे दुष्परिणाम फार वाईट आहेत. यासाठी कोरोनाबाधित व्यक्तीने विश्रांती आणि संतुलित आहार घ्यावा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ओमिक्रॉनच्या जाळ्यात सापडलेल्या रुग्णांमध्ये विविध प्रकारची लक्षणे दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत, कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. याशिवाय बरेच लोक सर्दी आणि खोकला व्हायरल म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण हे आजारंच तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. आम्ही तुम्हाला ओमायक्रॉनच्या काही लक्षणांबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. ही लक्षणं नेमकी कोणती ते जाणून घ्या.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
जर तुम्ही सर्दी आणि खोकल्याला हलक्यात घेत असाल तर त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. कारण सर्दी, खोकला, घसादुखी, ताप, श्वास घेण्यास त्रास, मळमळ, डोकेदुखी ही कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसताच तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधून तुमची चाचणी करून घ्या.
Omicron च्या संसर्गामुळे बद्धकोष्ठता वाढणे, झोपताना घाम येणे, डोळ्यांना सूज येणे आणि चव कमी होणे यांसारख्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब कोरोनाची चाचणी करा.
दुसरीकडे, जर तुम्हाला तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागावर लाल पुरळ दिसले तर ते देखील Omicron शी संबंधित आहेत, जर तुम्हाला हे दिसत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. यासाठी ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि स्वतःची तपासणी करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
हे ही वाचा :
- Rashmika Mandana : नॅशनल क्रश रश्मिका मंदना सारखा फिटनेस हवाय? फॉलो करा हा वर्क आऊट प्लॅन अन् डाएट
- Health Tips : हिवाळ्यात रोज रात्री गरम पाणी प्यायल्याने होतात 'हे' फायदे
- Coronavirus : चहा ऐवजी 'या' तीन काढ्यांचे करा सेवन, संसर्गापासून होईल संरक्षण, चवही राहील कायम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )