(Source: ECI/ABP News/ABP Majha)
2nd May 2022 Important Events : 2 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
2nd May 2022 Important Events : मे महिन्यातील प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या.
2nd May 2022 Important Events : मे महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 2 मे चे दिनविशेष.
1519 : इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि लिओनार्डो दा विंची यांचे निधन.
इटालियन प्रबोधनकाळातील श्रेष्ठ कलावंत, वैज्ञानिक आणि तत्त्वचिंतक, चित्रकार, शिल्पकार, वास्तुकार, अभियंता, संगीतकार, शारीरविज्ञ, गणिती, निसर्ग-वैज्ञानिक, संशोधक, तत्त्वज्ञ अशा अनेकविध गुणांनी त्याचे कलाजीवन संपन्न झाले होते. लिओनार्दोच्या मते काव्य आणि कला ही अस्सल वास्तवाच्या ज्ञानाचे साधन होत. केवळ मानसिक कल्पनातरंग एवढाच कलेचा अर्थ नाही. विज्ञानात सत्याचे मूल्य जेवढे आहे, त्यापेक्षा कलेत कमी नाही.
1920 : शास्त्रीय आणि नाट्यसंगीत गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म.
डॉ. वसंतराव देशपांडे हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते. वसंतराव देशपांड्यांनी असदअली खाँ, सुरेशबाबू माने, अमानतअली खाँ यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी संगीताच्या कार्यक्रमासाठी अफ्रिकेचा दौरा केला. तसेच पेडगावचे शहाणे, गुळाचा गणपती, दूधभात, अवघाची संसार वगैरे चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित 'मी वसंतराव देशपांडे' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. ज्यामध्ये वसंतरावांची भूमिका राहुल देशपांडे यांनी केली होती.
1921 : चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांचा जन्म.
सत्यजित रे हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे श्रेष्ठ भारतीय चित्रपट-दिग्दर्शक होते. सत्यजित रे हे चतुरस्त्र प्रतिभेचे कलावंत होते. साहित्य, चित्रकला, संगीत, रेखन, छायाचित्रण अशा विविध कलाक्षेत्रांत त्यांनी विपुल निर्मिती केली. यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकारतर्फे पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला. या शिवायही त्यांना युगोस्लाव्हियाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार, ऑक्सफर्ड विश्वविद्यालयातर्फे डी. लिट. असे अनेक मान सन्मान प्राप्त झाले. फ्रान्स येथील कान चित्रपट महोत्सव यांसहित यांना एकूण 11 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
1994 : बँक ऑफ कराड चे बँक ऑफ इंडिया मध्ये विलिनीकरण झाले.
1998 : गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, 5व्या लोकसभेचे सदस्य पुरुषोत्तम काकोडकर यांचे निधन.
1999 : कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्ष चार महिन्याच्या बालिकेने 51.1 कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन 3 तास 51 मिनिटांत पार केले.
2018 : भारतीय शहर कानपूर हे WHO द्वारे जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आले असून 14 इतर भारतीय शहरे टॉप 20 मध्ये आहेत.
महत्वाच्या बातम्या :