Marathi Dinvishesh : 1 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
Important days in 1 may : मे महिन्यातील प्रत्येक दिवसाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या.
Important days in 1 May : मे महिना सुरु आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 1 मे रोजीचे दिनविशेष.
1 मे : महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहात राज्यभर साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
1 मे : जागतिक कामगार दिन
जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी साजरा केला जाणारा दिवस आहे. हा दिवस साजरा करण्यास 1 मे 1886 पासून सुरुवात झाली. कोणत्याही समाजाच्या आणि देशाच्या विकासात कामगारांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. कामगारांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून जगभर 1 मे या दिवशी कामगार दिवस साजरा केला जातो. जगभरातील 80 हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो.
1962 : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना
नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम इ.स. 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात येते. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे 1962 रोजी करण्यात आली.
राज्यात सध्या 36 जिल्हे असून 34 जिल्हा परिषदा आहेत.परिषद ही पंचायतराजमधील महत्त्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते.
1983 : अमरावती विद्यापीठाची स्थापना
तत्कालीन नागपूर विद्यापिठाचे विभाजन करून 1 मे 1983 रोजी अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली. सुरुवातीला या विद्यापिठाचे नाव अमरावती विद्यापीठ असे होते. नंतर महाराष्टातील थोर संत व समाजसुधारक गाडगेबाबा यांचे नाव या विद्यापिठास देण्यात आले. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम हे पाच जिल्हे या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.
2009 : स्वीडन मध्ये समलिंगी विवाहाला अधिकृत मान्यता
समलिंगी विवाह दोन समान लिंगाच्या व्यक्तींदरम्यान कायदेशीर रित्या करण्यात येणारा विवाह आहे. जगातील अनेक देशांमध्ये समलैंगिक समागम करणे हा कायदेशीर गुन्हा नाही. तरी देखील बहुतांश देशांमध्ये समलिंगी विवाहास कायद्याने अधिकृत दर्जा दिलेला नाही. समलिंगी विवाहाला सर्वप्रथम 2001 साली नेदरलँड्स देशामध्ये मान्यता दिली गेली. त्यानंतर बेल्जियम, कॅनडा, नॉर्वे, दक्षिण आफ्रिका, स्पेन, स्वीडन, आइसलँड, पोर्तुगाल व आर्जेन्टिना या नऊ देशांनी मान्यता दिली. 1 मे 2009 रोजी स्वीडन देशात समलिंगी विवालाहा अधिकृत मान्यता देण्यात आली.
1919 : भारतीय प्रतिभासंपन्न पार्श्वगायक मन्ना डे यांचा जन्म
मन्ना डे हे चित्रपट उद्योगातील एक प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायक होते. त्यांचे खरे नाव प्रबोधचंद्र डे होते. मन्ना डे यांनी 1942 मध्ये तमन्ना या चित्रपटाद्वारे चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली आणि 1942 ते 2013 पर्यंत 3000 हून अधिक गाण्यांना आवाज दिला. 1 मे 1919 रोजी त्यांचा जन्म झाला आणि 24 ऑक्टोंबर 2013 रोजी त्यांचे निधन झाले. पद्मश्री, पद्म भूषण, पद्म विभूषण या पुरस्काराने त्यांन गौरवण्यात आले होते.
1922 : स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते मधु लिमये यांचा जन्म
समाजवादी नेते मधू लिमये यांचा जन्म 1 मे 1922 रोजी झाला. भारताच्या राजकारणात मधू लिमये यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. महाराष्ट्रातील या नेत्याने बिहारमध्ये आपली राजकीय कारकीर्दीचा फुलवली होती. ते बिहारमधून चारवेळा खासदार झाले होते.
1993 : स्वातंत्र्यसैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते ना. ग. गोरे यांचे निधन
ना. ग. गोरे यांचे संपूर्ण नाव नारायण गणेश गोरे असे होते. त्यांचा जन्म 15 जून 1907 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील हिंदळे या गावी झाला. त्यांचे शिक्षण पुणे येथे झाले. गोरे यांनी बी. ए. व एलएल बी या पदव्या संपान केल्या होत्या. नानासाहेब गोरे हे सामाजिक सुधारणांचे कट्टर पुरस्कर्ते होते. समाजातिल अनिष्ट रूढी आण परंपरा यांच्या विरोधात ते नेहमीच उभे राहिले. 1 मे 1993 रोजी त्यांचे निधन झाले.
1897 : स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना
रामकृष्ण परमहंस यांचे महान शिष्य स्वामी विवेकानंद यांनी 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. याचे मुख्यालय कोलकात्याजवळील बेलूर येथे आहे. या मिशनच्या स्थापनेच्या केंद्रस्थानी वेदांत तत्त्वज्ञानाचा प्रसार आहे. रामकृष्ण मिशन इतरांची सेवा आणि दान हे कर्मयोग मानते, जे हिंदू धर्माचे महत्त्वाचे तत्व आहे.
1739 : चिमाजीअप्पांनी सैन्यासह वसईवर हल्ला केला
चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या वसईवर निकराचा हल्ला केला. तीन महिन्याच्या युद्धानंतर 1 मे 1739 रोजी वसई मराठ्यांच्या ताब्यात आली.
1955 : महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रांचा जन्म
1 मे 1955 रोजी मुंबईत जन्मलेले आनंद महिंद्रा हे उद्योगपती कुटुंबातील तिसरी पिढी होते. त्यांचा जन्म हरीश आणि इंदिरा महिंद्रा यांच्या पोटी झाला. त्यांचे आजोबा जगदीश महिंद्रा, महिंद्रा आणि महिंद्र (M&M) च्या सामुहाचे सह संस्थापक होते. 4 एप्रिल 1991 रोजी आनंद महिंद्रा M&M Ltd चे उप व्यवस्थापकीय संचालक बनले. त्यावेळी कंपनीसाठी ही एक नवीन सुरुवात होती. 1991 मध्ये जेव्हा त्यांना M&M च्या कांदिवली कारखान्याचे काम सोपवण्यात आले तेव्हा आनंद महिंद्रा यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते.
1988 : अनुष्का शर्माचा वाढदिवस
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा जन्म 1 मे 1988 रोजी झाला. अनुष्काने 2009 साली आदित्य चोप्राच्या रब ने बना दी जोडी या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या आहेत.
1998 : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण
1956 : पोलियोची लस जनतेस उपलब्ध