NFT क्षेत्र भारतासाठी लाभदायक, या क्षेत्रात भारत कसा जागतिक लीडर होऊ शकतो?
India at 2047 : सध्याचा विचार करता भारत हा जगासाठी गेमिंग आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात एक महत्वपूर्ण बाजारपेठ आहे.
मुंबई: बहुसंख्य लोकांचा कल डिजिटल मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याकडे असताना भारतात नॉन-फंजिबल टोकन्स (NFT) मध्ये स्वारस्य वाढत आहे. विविध उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या अनेक विद्यमान टेक्नॉलॉजी स्टार्टअप्सनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर NFT आधारित उत्पादने जोडल्यामुळे आर्थिक भरभराटीची मोठी शक्यता आहे. सध्या भारत हा NFTs आणि गेमिंग, आर्थिकीकरण आणि सोशल नेटवर्किंग यासाठी एक प्रमुख बाजारपेठ आहे.
भारतात NFT ची क्रेझ
भारतातील बहुसंख्य कोट्यधीशांनी क्रिप्टोकरन्सी आणि NFT बद्दल ऐकले आहे. भारत जगासाठी गेमिंग आणि मनोरंजनासाठी एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे. सध्याचे नियम कठोर असूनही वास्तविक फायदे देणार्या उपक्रमांसाठी भारताची बाजारपेठ खुली आहे. ज्या भारतीय उद्योगांनी NFTs सर्वात लवकर स्वीकारले आहेत ते भारतातील चित्रपट आणि गेमिंग उद्योगांनी या आधीच NFTs चा स्वीकार केला आहे.
एकीकडे भारत सरकार क्रिप्टोकरन्सीबाबत नियमन करू इच्छित असताना दुसरीकडे कलाकार, प्लॅटफॉर्म ओनर्स आणि लिलावकर्ते आशावादी आहेत की NFTs भारतीय कलेसाठी नवीन आशा असेल. विशेषत: कोरोनाच्या नकारात्मक प्रभावांच्या काळात या सारख्या गोष्टीची आवश्यकता आहे असं त्यांचं मत आहे. नवीन क्रिप्टो-आर्ट प्लॅटफॉर्मचा उदय, न्यूज मेकिंग ऑक्शन सेल्स आणि सोशल मीडियावर प्रभावशाली कलाकारांचा वावर यामुळे भारतीय कला उद्योगातही उत्साही वातावरण निर्माण होण्यास मदत झाली.
भारतीय उद्योग NFTs कडे का झुकतोय?
फिनटेक उद्योगातही NFTs एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असं अनेक स्टार्टअप्सचं मत आहे. भारतात काही अब्ज डॉलर्सचे गेमिंग क्षेत्र आहे, त्यामध्ये CryptoPunk, Bored Ape Yacht Club आणि Azuki यांचा समावेश आहे, ते तुम्हाला पॅसिव्ह इनकम देखील देऊ शकतात. ही काही मोठी नावे आहेत ज्यांनी क्रिप्टो कम्युनिटीमध्ये NFTs च्या प्रचारात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. गेल्या दोन वर्षांत आणि विशेषतः 2021 मध्ये भारत 86 हून अधिक सक्रिय NFT-आधारित स्टार्टअप्ससह नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. विशेष म्हणजे 2021 मध्येच अशा 71 स्टार्टअप्सची सुरुवात झाली होती.
2021 मध्ये भारतात NFTs चे मार्केटिंग करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आलं. त्यामुळे भारतीयांच्या धोरणात मोठा बदल घडून आला. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना या संबंधी जाहिराती करताना, किंवा त्यामध्ये गुंतवणूक करताना पाहिल्यानंतर अनेक भारतीयांनी यामध्ये गुंतवणूक करण्यास तत्परता दाखवली. अमिताभ बच्चन, सलमान खान, कमल हासन, युवराज सिंग, रोहित शर्मा आणि मनीष मल्होत्रा यांच्यासह अनेक क्षेत्रातील सेलिब्रिटींनी 2021 मध्ये त्यांचे डिजिटल टोकन आधीच लॉन्च केले आहेत किंवा जाहीर केले आहेत.
हे वर्षं म्हणजे, 2022 साल हे नॉन-फंजिबल टोकनचे (NFTs) वर्ष असेल असा अंदाज आहे. अंदाजे 40 अब्ज डॉलर्स बाजार मूल्यासह NFTs सर्व उलाढालीसह ही बाजारपेठ अंदाजे 50 अब्ज डॉलर्सच्या एकूण बाजार मूल्यापर्यंत पोहोचते. विविध उद्योगांमधील ब्रँड आणि प्रभावकर्ते भारतात NFTs आणि मेटाव्हर्सचे प्रयोग करत आहेत. बॉलीवूड आणि क्रिडा क्षेत्रातल्या सेलिब्रिटींनी चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांची उत्पादने ऑफर करण्यासाठी त्यांचे स्वतःचे NFT मार्केट सुरू केले आहेत.
NFTs आणि भारतीय कला क्षेत्र
NFT बिजनेस मार्केटच्या कलेच्या दृष्टीकोनातूनही NFTs किंवा अपारंपरिक पद्धतीच्या कला प्रकारांतून संपूर्ण सर्जनशील क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे. त्याचा उदय ही भविष्यातील पिढ्यांना सामान्य वाटणाऱ्या गोष्टीची फक्त सुरुवात आहे. तथापि सुरुवातीच्या काळात अपेक्षित असलेल्या वेगाने NFT विस्तारू शकलं नाही, त्यामध्ये ते कमी पडलं. डिजिटल मालमत्तेमध्ये व्यवहार करण्यासाठी एक विश्वासार्ह, स्वागतार्ह बाजारपेठ म्हणून स्वत:ला स्थापित करण्याची क्षमता यामध्ये आहे.
NFT मार्केट अद्याप पूर्णत: विश्वास ठेवण्यासारखं नसेलही परंतु ते मोठ्या संधींनी भरलेले आहे. मोठ्या अस्थिरतेमुळे, गुंतवणूकदार कमी किमतीत खरेदी तर जास्त किमतीत विक्री असं धोरण आखून यामध्ये मोठा नफा कमावू शकतात.
अधिक कार्यक्षमता ही सर्वांनाच हवी असते. संभाव्य खरेदीदारांना नेहमी NFT बद्दल माहिती हवी असते. गुंतवणुकीच्या प्रक्रियेत ते उतरत असताना ते क्षेत्र अजूनही विकसित होत आहे आणि तसेच संबंधित प्लॅटफॉर्मवरून प्रीमियम ऑफर यासारख्या लाभांची अपेक्षा करतात. परिणामी विश्वासार्हता धोक्यात येते, नवीन कल्पनांना वाव मिळत नाही, तसेच यामुळे सर्व बाजारपेठेला नुकसान सहन करावं लागतं.
या सर्व गोष्टी लक्षात घेता लोकांना केवळ असेट्सबद्दलच नव्हे तर त्याची प्रक्रिया, कार्यक्षमता, कम्युनिटी आणि बाजारपेठेबद्दल देखील शिक्षित करणे आवश्यक आहे. हे डिजिटल जग त्याच्या सर्व पैलू आणि डोमेनमध्ये कसं काम करतं याची त्यांना संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे NFTs, क्रिप्टो आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा विचार करता माहितीवर बरंच काही अवलबून आहे.
या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी काही रचनात्मक पावले आणि उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे जेणेकरून येत्या काळात या क्षेत्रातील संधी गमावता कामा नयेत.