Hemangi Kavi : महिला दिनानिमित्त हेमांगी कवीकडून पोस्ट शेअर; म्हणाली 'खूप खालच्या पातळीला जाऊन हिणवलं'
पोस्टमध्ये हेमांगीनं (Hemangi Kavi) ट्रोलिंगबाबत तसेच तिच्या 'बाई, बुब्स आणि ब्रा...' या पोस्टवर लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल लिहिले आहे.

Hemangi Kavi : मराठी चित्रपट, नाटक आणि मलिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. हेमांगीनं शेअर केलेल्या पोस्टची चर्चा सोशल मीडियावर होत असते. हेमांगीनं शेअर केलेली 'बाई, बुब्स आणि ब्रा...' ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. वेगवगेळ्या विषयांवरील मतं हेमांगी तिच्या पोस्टमधून मांडत असते. नुकतीच हेमांगीनं जागतिक महिला दिनानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं ट्रोलिंगबाबत तसेच तिच्या 'बाई, बुब्स आणि ब्रा...' या पोस्टवर लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल लिहिले आहे.
हेमांगीनं पोस्टमध्ये लिहिले, '2021 हे वर्ष माझ्यासाठी महत्वाचं ठरलं! कलाकार म्हणून काही महत्वाच्या प्रोजेक्ट्समध्ये माझी वर्णी लागली जे 2022 मध्ये तुमच्या समोर येईलच पण एक बाई म्हणून जास्त महत्वाचं ठरलं!'
पुढे तिनं लिहिले, 'काही लोकांनी मला झिडकारलं, फटकारलं, खूप खालच्या पातळीला जाऊन हिणवलं (आज ही ते चालूच आहे), काहींनी साथ सोडली, मैत्रीण म्हणून ही नकोच म्हणून लांब केलं, काही लोकांनी तर माझी इतर ओळख त्यांना माहीत असताना देखील 'ही तीच ना... बाई, बुब्स वाली बाई' हीच माझी एकमेव ओळख म्हणून मुद्दाम माझ्यावर लादायच काम केलं.'
हेमांगीची पोस्ट-
View this post on Instagram
हेमांगीची 'लेक माझी दुर्गा' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तसेच ती पिपाणी, बंदीशाळा, डावपेच या चित्रपटांमधील हेमांगीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
संबंधित बातम्या
- Pathan : कोणी 85 तर कोणी 25 कोटी; पठाण चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलं एवढं मानधन
- Bhabiji Ghar Par Hai : एंट्रीआधीच नव्या 'गोरी मेम'ची जादू, आता 'अनिता भाभी'च्या भूमिकेत 'ही' अभिनेत्री
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाचा ट्रेलर आऊट, 11 मार्चला सिनेमा होणार प्रदर्शित
- Heart of Stone : प्रियांका अन् दीपिकानंतर आता आलियाची हॉलिवूड वारी; 'हार्ट ऑफ स्टोन'मध्ये साकारणार प्रमुख भूमिका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
