एक्स्प्लोर

Ti Majhi Premkatha: प्रेम आणि विश्वास यांचा अनोखा मिलाफ! 'ती माझी प्रेमकथा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Ti Majhi Premkatha : अभिनेत्री पद्मिनी कांबळे आणि अभिनेता तुषार धाकीते या नव्या कोऱ्या जोडीने 'ती माझी प्रेमकथा' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.

Ti Majhi Premkatha : आयुष्यात प्रत्येक जण एकदा का होईना प्रेमात पडतोच. मात्र, हेच प्रेम व्यक्त करण्याची पद्धत सर्वांची निराळी असते. काहींचे प्रेम हे सफल होते, तर काहींना प्रेमात असफलता मिळते. प्रेम टिकणार की, नाही हे ज्यावर अवलंबून असते तो म्हणजे विश्वास. अशाच प्रेमाच्या विश्वासाची प्रेमकथा घेऊन, अतिविश्वासमुळे झालेला प्रेमाचा घात घेऊन 'फिल्मी टाईम प्रोडक्शन' सह आणि 'कनिष्क अँड त्रिगेश एंटरटेनमेंट' सोबत निर्माते राजकुमार देगलूरकर, ओमप्रकाश बुक्कावार निर्मित 'ती माझी प्रेमकथा' (Ti Majhi Premkatha) या प्रेममय चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

येत्या 14 ऑक्टोबरला 'ती माझी प्रेमकथा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. एकूणच हा चित्रपट फक्त प्रेमकथा नसून, आजच्या तरूण पिढीला एक मोठा संदेश असणार आहे.

पाहा ट्रेलर :

अभिनेत्री पद्मिनी कांबळे आणि अभिनेता तुषार धकिते या नव्या कोऱ्या जोडीने चित्रपटाच्या ट्रेलर मधूनच शाबासकी मिळवली आहे. तर, ट्रेलरची सुरुवातच सर्वांच्या लाडक्या आवाजाने म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या आवाजाने सुरू झाल्याने त्यांच्या तोंडून ही प्रेमकथा ऐकणं नक्कीच रंजक ठरतंय. अभिनेता कपिल कांबळेच्या अभिनयाची जादूही ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय.

नव्या कलाकारांना संधी

अभिनेत्री पद्मिनी कांबळे आणि अभिनेता तुषार धाकीते या नव्या कोऱ्या जोडीने 'ती माझी प्रेमकथा' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. पद्मिनी आणि तुषारची लव्हेबल केमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नवोदित कलाकारांनी या चित्रपटात प्रेमाचे काय रंग उधळलेत हे पाहणे या चित्रपटात खरंच रंजक ठरेल. विशेष म्हणजे या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये ही झळकणार आहेत, तर भोंगा फेम कपिल कांबळे या चित्रपटात तुषारच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे.

एकमेकांवरील प्रेमाची कबुली देत प्रेमाच्या बंधनात अडकत गेल्यानंतर काही कालावधीने संशय आणि अविश्वासाने मारलेली उडी त्या प्रेमाचा अंत करते की, ते प्रेम अविश्वासाला थारा देत नाही हे 'तू माझी प्रेमकथा' या चित्रपटात पाहणे रंजक ठरणार आहे. सिद्धू आणि रेणूची जोडगोळी या चित्रपटात एक आगळी वेगळी कथा मोठ्या पडद्यावर आणणार आहे.

14 ऑक्टोबरला रिलीज होणार चित्रपट

दिग्दर्शक सूर्या यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि स्क्रीनप्ले अशा तीनही जबाबदाऱ्या सांभाळत चित्रपट बनविला आहे. या रोमँटिक चित्रपटाच्या संगीताची धुरा संगीतकार राजवीर गांगजी यांनी सांभाळी आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर आता 14 ऑक्टोबरची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. हा चित्रपट येत्या 14 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 10 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
Embed widget