एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 10 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 10 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

प्रवीण तरडे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक, पुणे सायबर पोलिसामध्ये तक्रार नोंद

प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचं फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचं समोर आलं आहे.  यासंबंधी त्यांनी पुणे सायबर पोलिसात तक्रार नोंद केली आहे. प्रवीण तरडे यांचे फेसबुक अकाउंट काही दिवसांपूर्वी हॅक झाले होते. त्यांनी इन्स्टाग्रामवरुन त्याची माहितीही दिली होती. आता या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. सायबर चोरट्यांनी प्रवीण तरडे यांचे बनावट पेज तयार करून त्यावरून अनेक जणांना फोन आणि मेसेज केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.  त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना मेसेज देखील करण्यात आले होते. प्रवीण तरडे यांनी ही माहिती दिली आहे. याप्रकरणी आता प्रवीण तरडे यांनी पुण्यातील सायबर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

इंडियन आयडॉलमधील या स्पर्धकाचा फॅन झाला विराट कोहली; केला खास मेसेज

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल'चा 13 वा (Indian Idol 13) सीझन सुरू झाला आहे. या कार्यक्रमामधील स्पर्धकांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तसेच या कार्यक्रमाच्या स्पर्धकांनी केवळ सामान्य लोकांची नाही तर सेलिब्रिटींची देखील मनं जिंकली आहेत. शनिवारी (8 ऑक्टोबर) एका एपिसोड दरम्यान कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायणनं स्पर्धक ऋषी सिंहला (Rishi Singh) क्रिकेटर विराट कोहलीनं (Virat Kohli) केलेल्या खास मेसेजबाबत सांगितलं.

उर्वशी रौतेला पोहोचली ऑस्ट्रेलियाला; नेटकरी म्हणाले, 'ऋषभ पंतच्या मागे गेली...'

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यातील सोशल मीडिया वॉर नेहमीच चर्चेचा विषय ठरला. उर्वशी आणि ऋषभ यांच्या नात्याची चर्चा देखील जोरदार रंगली होती. आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झालाय. या स्पर्धेत भारतीय संघ त्यांचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 23 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. आता नुकतीच उर्वशीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे आता अनेक नेटकरी उर्वशीला ट्रोल करत आहेत.

आदिपुरुष चित्रपटावरुन नवा वाद ; दिल्ली न्यायालयात याचिका दाखल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेता प्रभास (Prabhas) यांच्या  'आदिपुरुष' (Adipurush)  या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज जाला. त्यानंतर अनेकांनी या टीझरवर टीका केली. काहींनी या टीझरमधील सैफच्या लूकवर टीका केली तर काहींनी टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या VFX वर आक्षेत घेतला. आता आदिपुरषचा हा वाद दिल्लीच्या तीस हजारी न्ययालयापर्यंत पोहचला आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या विरुद्ध एक याचिका दिल्ली तीस हजारी न्ययालयात दाखल करण्यात आली आहे.

'माझी भूमिका तू करणार म्हणजे...'; गौरी सावंत यांनी सुष्मिताबद्दल शेअर केली 'ही' पोस्ट

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita Sen)  काही दिवसांपूर्वी तिच्या 'ताली' (Taali) या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले.  या पोस्टरला सुष्मितानं कॅप्शन दिलं, 'ताली- बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी! ' साडी, लाल टिंकली, हातात खड्याळ अन् गळ्यात माळ अशा लूकमधील फोटो सुष्मितानं शेअर केले.  या चित्रपटात सुष्मिता एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सुष्मिता टाळी वाजवताना दिसत दिसत आहे. सुष्मिता ट्रान्सजेंडर गौरी सावंत (Gauri Sawant)  यांची भूमिका साकारत आहे. नुकतीच गौरी सावंत यांनी सुष्मितासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

16:58 PM (IST)  •  10 Oct 2022

Mararthi Movie: 'सोंग' चित्रपटाची घोषणा; मिलिंद शिंदे आणि वीणा जामकर प्रमूख भूमिकेत

Mararthi Movie: अलीकडे मराठी चित्रपटसृष्टीत येणाऱ्या वैविध्यपूर्ण कथा-विषयांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. मनोरंजनासोबतच समाजातील वास्तविकतेला अधिक वाव मिळताना दिसतोय. के.सी.एस प्रोडक्शन निर्मित असाच एक वेगळ्या धाटणीचा मराठी चित्रपट 'सोंग' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. क्षितिज सी. शिंदे निर्मित आणि संजय कसबेकर लिखित-दिग्दर्शित 'सोंग' चित्रपटाचा मुहूर्त नुकताच कलाकार, तंत्रज्ञ आणि असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

15:38 PM (IST)  •  10 Oct 2022

GG Gandhada Gudi: दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं भावनिक ट्वीट

GG Gandhada Gudi: अभिनेते पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांचं 29 ऑक्टोबर रोजी निधन झालं. वयाच्या 46 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुनीत यांचा जीजी गंधाडा गुडी (GG Gandhada Gudi) हा शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  जीजी गंधाडा गुडी  (GG Gandhada Gudi) या त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. पुनीत यांच्या पत्नी अश्विनी पुनीत राजकुमार (Ashwini Puneeth Rajkumar) यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केलं आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी एक खास ट्वीट शेअर केलं. 

13:55 PM (IST)  •  10 Oct 2022

Ti Majhi Premkatha: प्रेम आणि विश्वास यांचा अनोखा मिलाफ! 'ती माझी प्रेमकथा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेम टिकणार की, नाही हे ज्यावर अवलंबून असते तो म्हणजे विश्वास. अशाच प्रेमाच्या विश्वासाची प्रेमकथा घेऊन, अतिविश्वासमुळे झालेला प्रेमाचा घात घेऊन 'फिल्मी टाईम प्रोडक्शन' सह आणि 'कनिष्क अँड त्रिगेश एंटरटेनमेंट' सोबत निर्माते राजकुमार देगलूरकर, ओमप्रकाश बुक्कावार निर्मित 'ती माझी प्रेमकथा' (Ti Majhi Premkatha) या प्रेममय चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

 

13:05 PM (IST)  •  10 Oct 2022

Tujhech Mi Geet Gaat Aahe: 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

Tujhech Mi Geet Gaat Aahe: स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे (Tujhech Mi Geet Gaat Aahe) मालिकेत मल्हार कामत आणि स्वराजचा सांगीतिक प्रवास प्रेक्षक अनुभवतच आहेत. लवकरच मालिकेत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची एन्ट्री होणार आहे. मल्हारने आपल्या गाण्याचं शिक्षण ज्यांच्याकडून घेतलं ते त्याचे गुरु पंडीत मुकुल नारायण ही व्यक्तिरेखा विक्रम गोखले साकारणार आहेत. बऱ्याच वर्षांनंतर विक्रम गोखले हे तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका अग्निहोत्रमध्ये विक्रम गोखले यांनी साकारलेले मोरेश्वर अग्निहोत्री आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. तुझेच मी गीत गात आहे मालिकेतली ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ते अतिशय उत्सुक आहेत. मालिका लोकप्रिय तर आहेच त्यासोबतच नव्या पीढीसोबत काम करताना नेहमीच आनंद होतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

12:32 PM (IST)  •  10 Oct 2022

‘विक्रम वेधा’ने पार केला 100 कोटींचा टप्पा! बॉक्स ऑफिसवर दिसली ह्रतिक-सैफच्या जोडीची जादू!

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन आता 10 दिवस उलटले आहेत. बॉक्स ऑफिसच्या जगतात या चित्रपटाने एक मैलाचा टप्पा पार केला आहे. होय, 'विक्रम वेधा'ने जगभरात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर, रिलायन्स एंटरटेनमेंटच्या प्रॉडक्शन अंतर्गत तयार झालेल्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 10 दिवसांत एकूण 69 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 News : टॉप शंभर बातम्यांचा आढावा : 01 February 2025 : ABP MajhaZero Hour | Namdev Shastri On Dhananjay Munde | नामदेवशास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण,विरोधकांचे सवालZero Hour Full |Namdev Shastri यांच्याकडून पाठराखण, Anjali Damania भगवानगडावर जाणार; पुढे काय घडणार?Zero Hour | Nagpur | महापालिकेचे महामुद्दे | रिंग रोडवरील साडे पाचशे झाडं कोणी कापली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
Embed widget