Khatron Ke Khiladi 13 : सेलिब्रिटी करणार खतरनाक स्टंट, रोहित शेट्टी घेणार स्पर्धकांची शाळा; 'खतरों के खिलाडी' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमाचं तेरावं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Khatron Ke Khiladi 13 : सेलिब्रिटी करणार खतरनाक स्टंट, रोहित शेट्टी घेणार स्पर्धकांची शाळा; 'खतरों के खिलाडी' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला Rohit Shetty Khatron Ke Khiladi 13 Premiere on july 17 know details Khatron Ke Khiladi 13 : सेलिब्रिटी करणार खतरनाक स्टंट, रोहित शेट्टी घेणार स्पर्धकांची शाळा; 'खतरों के खिलाडी' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/05/c1b1c86dd4ba78f8f7677325d0ffed5e1680682801499254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rohit Shetty Khatron Ke Khiladi 13 : सिने-निर्माता रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) या कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या साहसी खेळात अनेक सेलिब्रिटी खतरनाक स्टंट करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे रोहित शेट्टी स्पर्धकांची शाळा घेताना दिसेल.
'खतरों के खिलाडी 13' कधी सुरू होणार? (Khatron Ke Khiladi Start Date)
रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक या साहसी कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रोहित शेट्टीचा हा लोकप्रिय कार्यक्रम येत्या 17 जुलैपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मे महिन्यात या सीझनच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
View this post on Instagram
'खतरों के खिलाडी 13'मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार?
'खतरों के खिलाडी 13'साठी निर्मात्यांनी अनेक सेलिब्रिटींना विचारणा केली आहे. या पर्वात शिव ठाकरे (Shiv Thakare), प्रियंका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary), शालीन भनोट (Shalin Bhanot), सौंदर्या शर्मा (Soundarya Sharma), मुनव्वर फारुकी (Munawar Farooqui), अर्चना गौतम (Archana Gautam) आणि सुंबुल तौकीर खान या स्पर्धकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे सुंबुलने या पर्वात सहभागी होण्यासाठी नकार दिल्याचं समोर आलं आहे.
'खतरों के खिलाडी'च्या चाहत्यांमध्ये शिव ठाकरेची क्रेझ
'खतरों के खिलाडी 13'च्या चाहत्यांमध्ये हा कार्यक्रम सुरू होण्याआधीपासूनच शिव ठाकरेची (Shiv Thakare) क्रेझ पाहायला मिळत आहे. 'आपला माणूस' अर्थात शिव ठाकरेने अनेकदा 'खतरों के खिलाडी 13'मध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पर्वातील स्पर्धकांची निवड करायला रोहित 'बिग बॉस'च्या घरात गेला होता. त्यावेळी रोहितने घेतलेला टास्क शिव हरला. पण त्याची एकंदरीत खेळी पाहता रोहितने 'खतरों के खिलाडी 13'साठी शिवला विचारणा केली.
'खतरों के खिलाडी'च्या तेराव्या पर्वात एकापेक्षा एक स्पर्धक सहभागी होणार असल्याने त्यांची खेळी पाहायला चाहते उत्सुक आहेत. लवकरच या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात येईल.
संबंधित बातम्या
Khatron Ke Khiladi 13 : शिव ठाकरे ते उर्फी जावेद; 'खतरों के खिलाडी 13'साठी 'या' स्पर्धकांची नावं नक्की
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)