एक्स्प्लोर

रिंकू राजगुरु 'रंग माझा वेगळा'च्या यंदाच्या पर्वाची विजेती!

नऊ नायिकांमध्ये रंगलेल्या या स्पर्धेत प्रत्येकीला 1500 रुपयांचं बजेट देण्यात आलं होतं. 1500 रुपयांत कपडे, मेकअप, दागिने आणि चप्पल या चार गोष्टी घेत जी नायिका जास्तीत जास्त पैशांची बचत करेल ती ठरणार होती रंग माझा वेगळाची शॉपिंग क्वीन.

मुंबई : एबीपी माझावरील ‘रंग माझा वेगळा’च्या या पर्वाची विनर ठरली सैराट फेम रिंकू राजगुरु. रसिका सुनील, अक्षया देवधर, स्मिता शेवाळे, शर्वरी लोहकरे, हेमांगी कवी, ऋता दुर्गुळे, भाग्यश्री लिमये आणि सुरुची अडारकर या नायिकांना मागे टाकत रिंकू राजगुरु विजयी ठरली. नऊ नायिकांमध्ये रंगलेल्या या स्पर्धेत प्रत्येकीला 1500 रुपयांचं बजेट देण्यात आलं होतं. 1500 रुपयांत कपडे, मेकअप, दागिने आणि चप्पल या चार गोष्टी घेत जी नायिका जास्तीत जास्त पैशांची बचत करेल ती ठरणार होती रंग माझा वेगळाची शॉपिंग क्वीन. फक्त एवढंच नाही तर या नायिकांना यंदा शॉपिंगसोबतच एक अनोखा टास्क देण्यात आला होता आणि तो होता रंगाचा. कोणत्याही एका रंगाची निवड करत त्याच रंगाच्या चार वस्तू या नायिकांना खरेदी करायच्या होत्या. रिंकूने हे आव्हान स्वीकारत अकलूजमध्ये मनसोक्त शॉपिंग केलं, अर्थात बजेटचं भान राखत. रिंकूने एकूण खरेदी केली 110 रुपयांची आणि वाचवले तब्बल 1390 रुपये. महागाईच्या काळातही स्मार्ट शॉपिंग करत रिंकून पैसे बचतीचा गुरुमंत्रच तमाम गृहिणींना दिला. रिंकू राजगुरुला तगडी टक्कर मिळाली ती अभिनेत्री सुरुची अडारकरची. सुरुचीने 127 रुपयांची खरेदी करत 1373 रुपयांची बचत केली. स्पर्धा खूपच अटीतटीची होती आणि यात अव्वल ठरली सर्वांची लाडकी आर्ची अर्थात रिंकू राजगुरु. Rinku_Rang_Majha_Vegla_Winner रिंकूनंतर सर्वात जास्त बचत केली ती अभिनेत्री सुरुची अडारकरने. सुरुचीने 127 रुपयांची खरेदी करत 1373 रुपयांची बचत केली. स्मिता शेवाळे आणि 'घाडगे अॅण्ड सून' फेम भाग्यश्री लिमयेच्या खरेदीत तर अवघ्या 5 रुपयांचा फरक आहे. भाग्यश्रीने खरेदी केली 280 रुपयांची तर स्मिताने खरेदी केली 275 रुपयांची. शनाया म्हणजेच रसिका सुनीलनेही हे अनोखं अाव्हान स्वीकारत ठाण्याचं मार्केट पालथं घातलं. रसिकाने 305 रुपयात वस्तू घेत तब्बल 1195 रुपये वाचवले. हेमांगी कवीने शॉपिंग केली 340 रुपयांची तर ऋता दुर्गुळेने खरेदी केली 550 रुपयांची. पाठकबाई अर्थात अक्षया देवधरने मात्र बचतीचा फार विचार न करता 1215 रुपयांची मनसोक्त शॉपिंग केली. 'रंग माझा वेगळा'ची स्पर्धा खुपच अटीतटीची होती आणि यात अव्वल ठरली सर्वांची लाडकी अार्ची अर्थात रिंकू राजगुरु. विजेत्या रिंकूला बक्षीस म्हणून तमाम महिलांची आवडती पैठणी देण्यात आली. नायिका      शॉपिंग     बचत रिंकू            110              1390 सुरुची         127            1373 अक्षया       1215             285 शर्वरी         640             860 हृता           550             950 भाग्यश्री     280           1220 हेमांगी      340            1160 स्मिता       275           1225 शनाया     305           1195 'रंग माझा वेगळा'चे सर्व एपिसोड एकाच ठिकाणी https://www.youtube.com/playlist?list=PLh0Ol8Y0tIRR2WnyBb9_d_ofzwgMw0Z3V

महत्त्वाच्या बातम्या

बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget