एक्स्प्लोर

राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध

मनसेच्या वर्धापन दिनी मनसेनं ग्रामीण भागात, पंचायत समितीच्या सत्तेत सहभागी होत आपले राजकीय वजन सिद्ध केले आहे.

लातूर: मनसेप्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) रायगडावर जाऊन आपल्या पक्षाचा 20 वा वर्धापन दिन साजरा केला, मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गुढी पाडव्याच्या मेळाव्यात आपण सर्वांना उद्देशून भाषण करू असेही राज ठाकरेंनी म्हटले. विशेष म्हणजे, मनसेच्या वर्धापन दिनानिमित्ताने आज मनसेची जोरदार नोंदणीही सुरू आहे. त्यातच, लातूर जिल्ह्यात मनसेला गुडन्यूज मिळाली आहे. मनसेच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर रेणापूर पंचायत समितीत मनसेने (MNS) राजकीय ताकद दाखवून दिली. मनसे-भाजप युतीच्या माध्यमातून पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यात आली असून सभापतीपद मनसेच्या वाट्याला आले आहे. त्यामुळे, किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या मनसेन थेट सत्ता स्थापन केली. 

मनसेच्या वर्धापन दिनी मनसेनं ग्रामीण भागात, पंचायत समितीच्या सत्तेत सहभागी होत आपले राजकीय वजन सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच पंचायत समितीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. रेणापूर पंचायत समितीच्या एकूण आठ जागांपैकी काँग्रेसने तीन, भाजपाने तीन तर मनसेने दोन जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे, सत्तास्थापनेत मनसेची भूमिका निर्णायक ठरणार हे स्पष्ट झाले होते. त्यातच, पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यानुसार, आज झालेल्या पंचायत समिती सभापती निवडी पार पडल्या. त्यामध्ये, मनसेच्या मोनिका सूर्यवंशी यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून भाजपाचे शरद दरेकर यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे.

लातूर ग्रामीणचे भाजप आमदार रमेश कराड यांनी या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली होती. रेणापूरमध्ये मनसेच्या विजयाचे शिल्पकार असलेले मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांना भाजपसोबत आणण्यात त्यांना यश आले. त्यानंतर, मनसे आणि भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केली. त्यामध्ये, भाजपाने सभापतीपद मनसेला देत राजकीय लवचिकता दाखवत पंचायत समितीवर सत्ता स्थापन केली. मात्र, या सत्तेच्या सोपानासह पहिल्यांदाच मनसेचा झेंडा पंचायत समितीवर फडकला आहे.

काँग्रेस नेत्यांना राजकीय शह

लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणारे माजी आमदार धीरज देशमुख आणि आमदार अमित देशमुख यांना राजकीय शह देण्यात आमदार रमेश कराड यांची रणनीती यशस्वी ठरल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. विशेष म्हणजे लातूरमध्ये महापालिका निवडणुकीत काँग्रेसने आपलं वर्चस्व सिद्ध केलं असून राज्यातील एकमेव महापालिकेत काँग्रेसने स्वबळावर आपली सत्ता स्थापन केली आहे. 

हेही वाचा

प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Womens Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस
महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस
Mahesh Shinde On Eknath Shinde: शिवसेनेच्या आमदाराने एकनाथ शिंदेंच्या विरोधातच दंड थोपटलं; म्हणाले, जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठे?
शिवसेनेच्या आमदाराने एकनाथ शिंदेंच्या विरोधातच दंड थोपटलं; म्हणाले, जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठे?
Mahesh Shinde: मला पहिल्यापासून वेगळी वागणूक, एकनाथ शिंदेंच्या सभेचं निमंत्रणही नाही...; शिंदे गटाचे आमदार महेश शिंदेंनी सगळं सांगितलं, साताऱ्यातील अंतर्गत नाराजी उफाळणार?
मला पहिल्यापासून वेगळी वागणूक, एकनाथ शिंदेंच्या सभेचं निमंत्रणही नाही...; शिंदे गटाचे आमदार महेश शिंदेंनी सगळं सांगितलं, साताऱ्यातील अंतर्गत नाराजी उफाळणार?
Sanjay Raut on Devendra Fadnavis: फडणवीसांच्या कारकीर्दीत मुंबई, महाराष्ट्राचा 'उडता महाराष्ट्र' झालाय; संजय राऊतांचा घणाघात, महिला आरक्षण विधेयकावरूनही जोरदार हल्लाबोल
फडणवीसांच्या कारकीर्दीत मुंबई, महाराष्ट्राचा 'उडता महाराष्ट्र' झालाय; संजय राऊतांचा घणाघात, महिला आरक्षण विधेयकावरूनही जोरदार हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'भाजप संपवायला निघालेले मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नकोत' आमदार शिवाजी पाटलांची चंद्रकांतदादांसमोर भूमिका; मूश्रीफ सुद्धा बोलले, दिवसभरातील हायहोल्टेज बैठकांमध्ये काय काय घडलं?
'भाजप संपवायला निघालेले मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नकोत' आमदार शिवाजी पाटलांची चंद्रकांतदादांसमोर भूमिका; मूश्रीफ सुद्धा बोलले, दिवसभरातील हायहोल्टेज बैठकांमध्ये काय काय घडलं?
IPL 2026: सचिन, सेहवाग, धोनीसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं नेमकं काय घडलं?
सचिन, सेहवाग, धोनीसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं नेमकं काय घडलं?
Rashid Khan: 'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
Kolhapur Crime: ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
Hingoli Crime : अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: 'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
Sanjeev Jaiswal Motilal nagar: 'घरं कशी मिळतात बघतो, तू घुसखोर आहेस का?, इथूनच उचलतो', म्हाडाच्या संजीव जयस्वालांची रहिवाशांच्या बैठकीत मुजोरी
'घरं कशी मिळतात बघतो, तू घुसखोर आहेस का?, इथूनच उचलतो', म्हाडाच्या संजीव जयस्वालांची रहिवाशांच्या बैठकीत मुजोरी
Bigg Boss Marathi 6 Deepali Sayed Post: पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
Embed widget