Mrunmayee Deshpande : 'शाब्बास सुनबाई' मालिकेत होणार मृण्मयी देशपांडेची एन्ट्री; डान्स व्हिडीओ व्हायरल
Mrunmayee Deshpande : शाब्बास सुनबाई' या मालिकेत मृण्मयी देशपांडेची एन्ट्री होणार आहे.
Mrunmayee Deshpande On Shabbas Sunbai : लग्नानंतर स्वतःच्या संसारात अडकून पडल्यावर आपली स्वप्नं, स्वप्नंच राहून जातात. लग्नानंतर बऱ्याचजणी चूल आणि मूल यातच अडकून राहतात. पण अशातही मार्ग काढून आपली स्वप्नं पूर्ण करणाऱ्या प्रत्येकीची गोष्ट म्हणजे 'शाब्बास सुनबाई' (Shabbas Sunbai) ही मालिका. आता या मालिकेत मृण्मयी देशपांडेची (Mrunmayee Deshpande) एन्ट्री होणार आहे.
आपली स्वप्नं न विसरता त्या स्वप्नांसाठी झटणाऱ्या आणि समोर येईल त्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या अशा सगळ्यांसाठीची 'शाब्बास सुनबाई' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. जगाच्या स्पर्धेत नेहमी पहिलं येण्यासाठी वडिलांनी घडवलेल्या संजीवनीला तिच्या स्वप्नांसाठी खऱ्या अर्थाने संघर्ष करावा लागणार आहे तिच्या लग्नानंतर.
ध्यानीमनी नसताना नाशिकच्या प्रतिष्ठित येवलेकर कुटुंबात लग्न झालेल्या संजीवनीसाठी सगळी चक्र लग्नानंतर फिरली. तिच्या या संघर्षाच्या लग्नाच्या निमित्ताने संजीवनीच्या भेटीला येत आहे एक खास पाहुणी आणि ती पाहुणी म्हणजे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे.
View this post on Instagram
संजीवनीची गोष्ट आता संघर्षच्या वाटेवर असून मालिकेत तिच्या लग्नाची तयारी जय्यत झालेली आहे. या लग्नसोहळ्यात महाराष्ट्राची लाडकी नायिका मृण्मयी देशपांडे हजेरी लावत असून ती या लग्न सोहळ्यात नाचणार सुद्धा आहे.
'शाब्बास सुनबाई' आता रंजक वळणावर आली असून लग्नानंतर संजीवनीचा नेमका कशाशी आणि कोणाशी संघर्ष करावा लागणार आहे? 'शाब्बास सुनबाई' म्हणणाऱ्या अप्पा येवलेकरांचा संजीवनीला सून करण्यामागे नेमका काय हेतू आहे?
अप्पासाहेब खरोखरच महिला सबलीकरणाचे खंदे पुरस्कर्ते आहेत की त्यांच्या रूपात संजीवनीच्या आयुष्यात एका खलनायकाचा प्रवेश होऊ लागलाय? थोडक्यात संजीवनीच्या स्वप्नांसाठी तिचं लग्न विघ्न ठरणार की प्रवाहा विरुद्ध पोहून आपली स्वप्नं साकारण्यात संजीवनी यशस्वी होणार? हे मालिकेत पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या