एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Gulhar : माधव अभ्यंकरांच्या लूकनं वेधलं लक्ष ; 'गुल्हर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

'रात्रीस खेळ चाले' (Ratris Khel Chale) या मालिकेतील माधव अभ्यंकर यांच्या अण्णा नाईक (Madhav Abhyankar) या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

Gulhar : चित्रपटांप्रमाणेच काही मालिका आणि नाटकदेखील कलाकारांना सर्वदूर पोहोचवण्याचं काम करत असतात. दररोज घरोघरी पोहोचणाऱ्या मालिकेतील एखाद्या कलाकारानं साकारलेलं कॅरेक्टर रसिकांच्या पसंतीस उतरलं की मग तो कलाकार त्या व्यक्तिरेखेच्याच नावानं जनमानसात ओळखला जातो. ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर (Madhav Abhyankar) यांच्याबाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. 'रात्रीस खेळ चाले' (Ratris Khel Chale) या मालिकेतील माधव अभ्यंकर यांच्या अण्णा नाईक या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत जबरदस्त वाढ झाली आहे. हेच माधव अभ्यंकर आता एका वेगळ्या रूपात आपल्या चाहत्यांना भेटायला येणार आहेत. 'गुल्हर' (Gulhar) या आगामी मराठी चित्रपटात माधव अभ्यंकरांचा लक्षवेधी लुक रसिकांना नक्कीच भावणार आहे.

शांताराम (आप्पा) मेदगे, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे आणि अबिद सय्यद यांनी आयडियल व्हेंचरच्या बॅनरखाली 'गुल्हर' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यापूर्वी 'बाबो'सारखा वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणारे रमेश चौधरी यांनी 'गुल्हर'चं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाची कथा धनगर समाजातील एका 11 वर्षांच्या लहान मुलावर आधारलेली आहे. यात माधव अभ्यंकर यांनी साकारलेलं कॅरेक्टर अत्यंत महत्त्वाचं आहे. डोक्याला गुलाबी फेटा, पांढरा सदरा, धोतर, हातात घुंगरू लावलेली काठी, उजव्या हातात कडं, डाव्या खांद्यावर उपरणं, गळयात तावीज, झुपकेदार मिशा, पायात वहाणा आणि हळदीनं भरलेला मळवट असं काहीसं माधव अभ्यंकरांचं रुपडं 'गुल्हर'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात माधव अभ्यंकर नेमके कोणत्या भूमिकेत झळकणार आहेत हे अद्याप रिव्हील करण्यात आलेलं नाही.

माधव अभ्यंकरांसोबत यात विनायक पोद्दार, रवी काळे, भार्गवी चिरमुले, सुरेश विश्वकर्मा, किशोर चौगुले, रुक्मिणी सुतार, शिवानी बावकर, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, मंजिरी यशवंत, गणेश कोकाटे, कपिल कदम, पुष्पा चौधरी, स्वप्निल लांडगे, रेश्मा फडतरे, सचिन माळवदे, देवेंद्र वायाळ अशी मराठीतील दमदार स्टारकास्ट आहे. 'गुल्हर'साठी मोहन पडवळ यांनी कथालेखन केलं असून, संजय नवगिरे यांनी पटकथा व संवादलेखन केलं आहे. कुमार डोंगरे यांनी छायालेखन व संकलन केलं आहे, तर नृत्य दिग्दर्शन विशाल पाटील यांचं आहे. साऊंड डिझाईन निखिल लांजेकर आणि हिमांशू आंबेकर यांनी केलं असून, केदार दिवेकर यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाचे प्रोजेक्ट हेड अमर लष्कर आहेत.

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Dhananjay Munde : यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...,  धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक, परळीच्या विजयावर म्हणाले...
यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट..., धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule PC : विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सदस्यता नोंदणीचा संकल्पChhagan Bhujbal On NCP Result : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जनमान्यता - छगन भुजबळChandrashekhar Bawankule Full PC : विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणीला प्रारंभ होणारMaharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Dhananjay Munde : यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...,  धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक, परळीच्या विजयावर म्हणाले...
यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट..., धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Embed widget