एक्स्प्लोर

Actor Ramesh Pardeshi Attacked By Stray Dog: माझ्या मांडीचा चावा घेतला! पुण्यातील टेकडीवर 'पिट्या भाई'सोबत घडला भयंकर प्रकार, अनुभव शेअर करत म्हणाला...

Actor Ramesh Pardeshi Attacked By Stray Dog: सोशल मीडियावर पोस्ट करुन रमेश परदेशीनं त्याच्यासोबत पुण्यात घडलेला गंभीर प्रकार सांगितला आहे. तसेच, पुण्यातील नगरसेवक, आमदार, महापौरांनी भटक्या कुत्र्यांची काहीतरी सोय करावी, अशी विनंती केली आहे.

Actor Ramesh Pardeshi Attacked By Stray Dog: राज्यासह देशभरात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा भलताच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी हा मुद्दा चक्क देशाच्या सर्वोच्च न्यायालयातही (Supreme Court) पोहोचला होता. मोकाट किंवा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची अनेक प्रकरणं दररोज म्हटलं तरी ऐकू येतात. याची दखल घेत ठिकठिकाणच्या प्रशासनानंही ठोस पावलं उचलली आहेत. पण, या मोकाट कुत्र्यांना आळा घालणं फारत अवघड आहे. सातत्यानं भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची प्रकरणं ऐकू येत आहेत. अशातच आता एका मराठी अभिनेत्यावरही भटक्या कुत्र्यांनी (Stray Dog) हल्ला केला आहे. यामध्ये अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली आहे. कुत्र्‍यांच्या हल्ल्यात जखमी झालेला 'मुळशी पॅटर्न' (Mulshi Pattern) फेम अभिनेता म्हणजे, पिट्याभाई म्हणजेच रमेश परदेशी. सोशल मीडियावर पोस्ट करुन रमेश परदेशीनं त्याच्यासोबत पुण्यात घडलेला गंभीर प्रकार सांगितला आहे. तसेच, पुण्यातील नगरसेवक, आमदार, महापौरांनी भटक्या कुत्र्यांची काहीतरी सोय करावी, अशी विनंती केली आहे.

'पिट्या भाई' अर्थात अभिनेता रमेश परदेशीची (Ramesh Pardeshi) पोस्ट आता चर्चेत आली आहे. 'मुळशी पॅटर्न' या सिनेमात रमेश परदेशीनं पिट्या भाईची भूमिका साकारली होती. अभिनेता रमेश परदेशीसोबत घडलेल्या गंभीर प्रकारानं सर्वांचीच झोप उडवली आहे. 

सोशल मीडियावरच्या पोस्टबाबत रमेश परदेशीनं काय म्हटलंय?

'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेता रमेश परदेशी म्हणजेच, पिट्या भाईनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलंय की, "टेकडीवर कोण असायला हवे  ससे. मोर, फिरायला येणारी तरुण, लहान मुले.वृद्ध मालकांसोबत येणारी पाळीव प्राणी,वृक्ष प्रेमी की  #भटकी_कुत्री?... काल नेहमीप्रमाणे ARAl टेकडीवर पळायला गेलो होतो पळत असताना एका ठिकाणी 4 ते 5 कुत्री खात होती, तिथून जाताना त्यातल्या एका कुत्र्याने माझ्या मांडीचा चावा घेतला. मी तसचं पुढे गेलो तर माझ्यासारखाच एक प्राणी प्रेमी मित्र 10 ते 12 कुत्र्यांना खायला देत होता (मी पण कधी कधी सीटी मध्ये उपाशी कुत्र्यांना पाव,बिस्किट देत असतो) मी त्याला बोललो अरे इथे नको देऊ खायला, मला आताच एक कुत्रे मागे चावलाय. मेन रोडवर दे नाहीतर हे लहान मुले. वृद्ध यांच्या अंगावर येतात आणि मी निघून गेलो घरी आल्यावर आंघोळ करताना लक्षात आले, आपल्याला मगाशी किरकोळ चावलंय, असं वाटलेले ते जास्त दुखतंय. म्हणून सकाळी सरकारी दवाखान्यात गेलो, तर त्यांनी सांगितलं, टोटल 5 इंजेक्शन घ्यावी लागतील काही तरी टाइप 3 आहे म्हणून. आता 2 घेतली अजून 7 दिवसाच्या अंतराने बाकी घ्यायची आहेत... हेच एखाद्या लहान मुलाला किंवा वृद्ध माणसाला चावलं असतं, तर केवढ्याला पडले असते...?"

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ramessh P Pardeshi (@_pitya_bhai)

"मी पण प्राणी प्रेमी आहे पण मला वाटतय ह्या भटक्या कुत्र्यांची काहीतरी बरी सोय केली पाहिजे राहणे खाण्याची आज एक अंगावर आला चावला मी प्रतिकार करू शकलो पण 10/12 एकदम अंगावर आले तर बरे वाईट काही झाले तर जबाबदार कोण अजून खूप जबाबदाऱ्या अंगावर आहेत...", असं अभिनेता रमेश परदेशी म्हणाला आहे. 

"माननीय आणि शहरातल्या भटक्या कुत्र्यांना जर एका ठिकाणी जमा केले आणि त्यांची नसबंदी केली तर PMC चं काम पण एका ठराविक ठिकाणी रीतसर आणि सुसह्य  होईल जे कोणी प्रणिप्रेमी मित्र आहेत, ते त्या ठिकाणी येऊन त्यांच्याशी खेळतील त्यांचं आजारपण डॉक्टर सगळं एकाठिकाणी होईल... माणसं रस्त्यावर आणि टेकडीवर सुरक्षित फिरतील, कुत्री घाबरून भीतीपोटी त्यांच्यावर attack करणार नाहीत... माणसाचा आणि कुत्र्याचा दोघांचा  जीव अतिशय महत्वाचा आहे, दोन्ही जीव सुरक्षित राहतील..... सरकारला विनंती आहे की, त्यांनी ह्याची दखल घ्यावी...", असं रमेश परदेशी म्हणाला आहे. 

पुढे बोलताना पिट्या भाई म्हणजेच, रमेश परदेशीनं पुण्यातील नगरसेवक,आमदार,महापौरांनी विनंती केली आहे. रमेश परदेशीनं पोस्टमध्ये म्हटलंय की, "नगरसेवक,आमदार,महापौर सर्वांना विनंती आहे की भटक्या कुत्र्यांची काही तरी चांगली सोय करावी. ह्या मुक्या प्राण्यांवर पण अन्याय होणार नाही आणि ते पण छान जगतील आणि बाकी नागरिक पण ... परमेश्वर करो आता रेबीज वैगरे नको व्हायला...."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Iranian Actress Mandana Karimi Leaving India: 'भारतात सुरक्षित वाटत नाही...'; 37 वर्षांच्या 'या' अभिनेत्रीला देश सोडून जायचंय इराणला, म्हणाली...

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Zoya Akhtar on Zindagi Na Milegi Dobara 2: 15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 
15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget