एक्स्प्लोर

Koffee With Karan 7: ‘आम्ही आजही एक परिवार’, घटस्फोटानंतर किरण रावसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

Koffee With Karan 7: आमिरच्या घटस्फोटाच्या घोषणेने सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. त्यांच्या विभक्त होण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Koffee With Karan 7: बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान चित्रपटाची ही जोडी करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये (Koffee With Karan 7) सहभागी होणार आहे. या शोमधील त्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये त्याने आपल्या आणि किरणच्या (Kiran Rao) नात्यावरही भाष्य केले आहे. आमिरने गेल्या वर्षी म्हणजेच 2021मध्ये किरण रावपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती.

आमिरच्या घटस्फोटाच्या घोषणेने सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. त्यांच्या विभक्त होण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दोघेही पती-पत्नी म्हणून वेगळे झाले असले, तरी आई-वडील म्हणून दोघेही एकत्र आहेत. दोघांनाही आपल्या मुलाच्या संगोपनात कोणताही अडथळा येऊ द्यायचा नाही. मुलगा आझादला दोघांचेही प्रेम मिळावे, यासाठी दोघेही प्रयत्न करतात. करणच्या या शोमध्ये आमिरने त्याच्या आणि पूर्व पत्नी किरण राव व रीना दत्ता यांच्यासोबतच्या नात्याविषयी चर्चा केली.

मी दोघींचाही आदर करतो!

रीना दत्त आणि किरण राव यांच्याशी विभक्त झाल्यानंतर आमिर खानने त्यांच्यासोबतच्या आपल्या नात्याबद्दल सांगितले. तो म्हणाला की, ‘मला या दोघांबद्दल खूप आदर आहे. आम्ही नेहमीच एक कुटुंब राहू. कितीही व्यस्त असलो तरीही आम्ही सगळे आठवड्यातून एकदा भेटतो. आम्ही सर्व एकमेकांची काळजी घेतो आणि एकमेकांचा आदर करतो.’

आमिर खानला पहिली पत्नी रीनापासून इरा आणि जुनैद ही दोन मुले आहेत. तर, किरण राव आणि आमिरला आझाद राव हा मुलगा आहे. दोघेही मिळून आपल्या मुलाची काळजी घेत आहेत.

करीना उडवणार आमिरची खिल्ली!

आमिर आणि करीनाचा एपिसोड हा शोचा 5वा एपिसोड असणार आहे. हा शो गुरुवारी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होईल. नुकताच याचा प्रोमो रिलीज झाला आहे. ‘कॉफी विथ करण’च्या या प्रोमोमध्ये करीना ही आमिरची खिल्ली उडवताना दिसली आहे. करीना प्रोमोमध्ये म्हणते की, अक्षय कुमार 30 दिवसांमध्ये चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करतो. पण, आमिर हा 100 दिवसांत शूटिंग पूर्ण करतो. तसेच, करीना आणि आमिर या एपिसोडमध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत देखील चर्चे करणार आहेत. प्रोमो व्हिडीओ रिलीज झाल्यानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. ‘कॉफी विथ करण’चा हा एपिसोड मजेशीर आणि हटके असणार आहे, अशा कमेंट्स करणनं शेअर केलेल्या प्रोमो व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

हेही वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 16 March 2025Special Report | Beed Crime | बीडमध्ये चालकाला डांबून ठेवत जबर मारहाण, हत्येनंतरची ऑडिओ क्लिप व्हायरलSpecial Report | Beed Teacher Story | परिस्थिने हताश केलं, शिक्षकांने मृत्यूला कवटाळलं; धनंजय नागरगोजेंची मन हेलावून टाकणार पोस्टBhaskar Khatgaonkar : काँग्रेसचे भास्करराव खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर, शिंदेंकडून पण होती ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
North Macedonia Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
Embed widget