Laal Singh Chaddha Song Kahani : 'पहिल्या प्रेमाच्या आठवणींना उजाळा'; लाल सिंह चड्ढामधील 'मैं की करां?' गाणं रिलीज
'मैं की करां?' (Main Ki Karaan?) हे गाणं प्रदर्शित झालं आहे.
Laal Singh Chaddha Song Kahani : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) च्या 'लाल सिंग चड्ढा'ला (Laal Singh Chaddha) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात आहेत. आमिरसोबतच या चित्रपटामध्ये करिना कपूर (Kareena Kapoor), नागा चैतन्य (Naga Chaitanya), मोना सिंह (Mona Singh), मानव विज (Manav Vij) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटामधील 'कहानी' हे पहिलं गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झाले. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता नुकतच चित्रपटामधील दुसरं गाणं देखील प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचं नाव 'मैं की करां?' (Main Ki Karaan? ) असं आहे. हे गाणं प्रसिद्ध गायक सोनू निगमनं गायलं आहे.
टी सीरिजनं त्यांच्या यूट्युब चॅनलवरुन हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. गाण्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं की, 'रोमीच्या साथीने सोनू निगमने गायलेले हे सुंदर प्रेम गीत तुमच्या पहिल्या प्रेमाच्या आठवणींना उजाळा देईल. हे गाणं प्रीतमनं संगीतबद्ध केले आहे आणि अमिताभ भट्टाचार्य हे या गाण्याचे गीतकार आहेत.'
एका मुलाखतीमध्ये सोनू निगमनं या गाण्याबाबत सांगितलं, 'जेव्हा प्रीतमनं मला या गाण्याबाबत सांगितलं तेव्हा तो म्हणाला की आमिरला वाटतं की, हे गाणं मी गायले पाहिजे. मी आधी देखील आमिरच्या चित्रपटामधील गाणं गायलं आहे. त्या सर्व गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. मला वटातं की, मैं की करां गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल.'
लाल सिंह चड्ढा हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18 स्टडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
लाल सिंह चढ्ढासाठी कलाकारांनी घेतले एवढे मानधन
लाल सिंह चड्ढा चित्रपटासाठी आमिरनं 50 कोटी रूपये मानधन घेतलं आहे. अभिनेत्री करिना कपूर ही लाल सिंह चड्ढा या चित्रपटामध्ये मनप्रीत कौर ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये करिनानं आठ कोटी रूपये मानधन घेतलं आहे. तर दाक्षिणात्य स्टार नागा चैतन्यनं या चित्रपटासाठी त्यानं सहा कोटी एवढं मानधन घेतलं आहे.
हेही वाचा :
- Deepika Padukone : Louis Vuitton ब्रॅंडची दीपिका पदुकोण ब्रँड अॅम्बेसेडर; अशी निवड झालेली पहिलीच भारतीय महिला
- Jacqueline Fernandez : ‘फक्त IIFA पुरस्कारांत सामील होऊ द्या!’, ईडीने पासपोर्ट जप्त केल्याने जॅकलिनची कोर्टात धाव!
- Cannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवर दिसणार हिना खानचा जलवा! ‘कान्स’मध्ये सामील होणार टीव्ही अभिनेत्री!