Laal Singh Chaddha Boycott : बायकॉट 'लाल सिंह चड्ढा' वर आमिर खाननं सोडलं मौन; म्हणाला, 'लोकांना वाटतं मला भारत...'
सोशल मीडियावर लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) या सिनेमावर नेटकऱ्यांकडून बहिष्कार टाकला जात आहे.
Laal Singh Chaddha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) या आगामी चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सोशल मीडियावर या सिनेमावर नेटकऱ्यांकडून बहिष्कार टाकला जात आहे. लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचा मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. या सर्व गोष्टींवर आता आमिरनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला आमिर?
बऱ्याच दिवसांपासून आमिरनं मोठ्या पडद्यावरुन ब्रेक घेतला होता. आता तो लाल सिंह चड्ढा चित्रपटामधून कम-बॅक करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट फॉरेस्ट गंप या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर बायकॉट 'लाल सिंह चड्ढा' हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. आता या गोष्टीबाबत आमिरनं प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, 'काही लोकांना वाटतं की मला भारत देश आवडत नाही, या गोष्टीचं मला दु:ख होतं. पण मला हे सांगायचं आहे की ते पूर्णपणे चुकीचे आहे. मी सर्वांना विनंती करतो की माझ्या चित्रपटावर बहिष्कार घालू नये आणि कृपया थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघावा.'
लाल सिंह चड्ढा हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18 स्टडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
लाल सिंह चढ्ढासाठी कलाकारांनी घेतले एवढे मानधन
लाल सिंह चड्ढा चित्रपटासाठी आमिरनं 50 कोटी रूपये मानधन घेतलं आहे. अभिनेत्री करिना कपूर ही लाल सिंह चड्ढा या चित्रपटामध्ये मनप्रीत कौर ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये करिनानं आठ कोटी रूपये मानधन घेतलं आहे. तर दाक्षिणात्य स्टार नागा चैतन्यनं या चित्रपटासाठी त्यानं सहा कोटी एवढं मानधन घेतलं आहे.
हेही वाचा: