'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...'; प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
जग कितीही काळाच्या पुढे जात असलं तरी तुमच्या वाट्याला येणारे संघर्ष काही अंशी तरी राहणार आहेतच दुर्दैवाने.. असंही तो म्हणाला.

Gaurav Malankar: जगभरात 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करतात. अनेकांनी काल सोशल मीडियावर महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. काहींनी आपला आयुष्यातील खास स्त्रियांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पोस्ट केल्याचं दिसतं. दरम्यान, मराठी अभिनेत्याची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. अभिनेता गौरव मालनकर या अभिनेत्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मासिक पाळीच्या वेदना आम्हा कळणार नाहीत. 'आमच्याकडे बनियान न घालण्याची मोकळीक आहे; पण तुम्हाला ब्रा न घालण्याची मुभा नाही कधीच भले स्तनाच्या कर्करोगाचा आकडा कितीही वाढो, आम्हाला काय त्याचं.' असं तो म्हणालाय. 'फुलपाखरू’, ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ या मालिकांत तो गौरव महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. आगामी काळात तो कोणत्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
नेमकी काय केलेली अभिनेत्याने पोस्ट
"आम्हाला मासिक पाळीच्या वेदना कळणार नाहीत कधीच आम्हाला लेबर पेन कळणार नाही कधीच, आम्हाला दिवस दिवस साडी नेसून, केसांना असंख्य पिना टोचून शूटिंगला उभं राहण्याचं दुःख कळणार नाही कधीच, आमच्याकडे ननियमन घालण्याची मोकळीक आहे,पण तुम्हाला ब्रा न घालण्याची मुभा नाही कधीच
(म्हणजे breast cancer चा आकडा कितीही वाढो) आम्हाला काय त्याचं, संबंध कपडे परिधान करून सुद्धा रस्त्यावरून चालताना तुमच्या अवयवांकडे निरखून बघणाऱ्या नजरा पचवायची ताकद आमच्यात येणार नाही कधीच.. "

"वर्किंग वुमन असलात तरी so called संस्कारी राहण्याची फुशारकी लोकांनी थोपवलेली जबाबदारी आम्हाला पार पाडता येणार नाही कधीच, मी माझ्या बायको, प्रेयसीला पूर्ण स्वातंत्र्य देतो हे ह्यात सुद्धा एक मेल इगो आहे हे आम्हाला कळणार नाही कधीच, असो जग कितीही काळाच्या पुढे जात असलं तरी तुमच्या वाट्याला येणारे संघर्ष काही अंशी तरी राहणार आहेतच दुर्दैवाने..जग पुरुषप्रधान संस्कृतीतून लवकरात लवकर बाहेर पडे ही तुम्हाला महिलादिनी शुभेच्छा.. तुम्ही fighter आहात. Happy women's day girls " अशी पोस्ट त्याने केलीय. अनेकजण त्याच्या या पोस्टचं कौतुक करताना दिसतायत.





















