Dipika Kakar : दीपिका कक्कर दुसऱ्यांदा आई होणार? व्हायरल व्हिडीओने चर्चांना उधाण
Dipika Kakar Latest News : दीपिका ही आपल्या बाळासह शोएबला भेटण्यासाठी सेटवर जाते. अशाच एका भेटीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे दीपिका दुसऱ्यांदा गरोदर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Deepika Kakar : दीपिका कक्कर (Dipika Kakar) आणि शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim) हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असणारं जोडपं आहे. 22 फेब्रुवारी 2018 रोजी हे दोघे विवाहबद्ध झाले. त्यांच्या लग्नाच्या पाच वर्षानंतर, या जोडप्याला 21 जून 2023 रोजी रुहान हा मुलगा झाला. दीपिका आणि शोएब अनेकदा त्यांच्या चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असतात. शोएब सध्या 'झलक दिखला जा 11' मध्ये आहे. दीपिका ही आपल्या बाळासह शोएबला भेटण्यासाठी सेटवर जाते. अशाच एका भेटीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे दीपिका दुसऱ्यांदा गरोदर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अलीकडेच दीपिका कक्करचा शोएब इब्राहिम आणि त्याचा मुलगा रुहानसोबतचा एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे. व्हिडिओमध्ये शोएबचे कुटुंब 'झलक दिखला जा 11' च्या सेटच्या बाहेर असलेल्या पापाराझी आणि चाहत्यांसाठी पोज देताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, शोएब निळ्या रंगाच्या स्वेटशर्टमध्ये स्मार्ट दिसत आहे.
दीपिका कक्कर दुसऱ्यांदा गरोदर आहे का?
शोएब इब्राहिमने आपला मुलगा रुहानला कडेवर घेतले आहे. लाल रंगाच्या अनारकलीत दीपिका खूपच सुंदर दिसत होती. हलका मेकअप आणि केस मोकळे सोडल्याने तिच्या लूक खुलून दिसत होता. पण अभिनेत्रीने तिचा दुपट्टा पोट दिसू नये अशा पद्धतीने घेतल आहे. दीपिकाचा हे वागणं नेटिझन्सच्या नजरेतून सुटले नाही. नेटकऱ्यांमध्ये दीपिका दुसऱ्यांदा गरोदर आहे का अशी चर्चा सुरू झाली.
View this post on Instagram
कोण आहे दीपिका कक्कर?
'ससुराल सिमर का' या मालिकेतली 'सिमर' ची दीपिकाने केलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली होती. दीपिका ही 'बिग बॉस' या रिएलिटी शोच्या 12 व्या सीझनची विजेती ठरली होती.
टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री दीपिका कक्कर लग्नासाठी धर्म बदलल्यामुळे प्रचंड चर्चेत आली होती. या वेळी तिच्यावर जोरदार टीका देखील झाली होती. मात्र, कुण्याच्याही टीकेकडे लक्ष न देता दीपिकाने आपल्या प्रेमाची साथ दिली.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने जेट एअरवेजमध्ये 3 वर्षे एअर होस्टेस म्हणून कामही केले. मात्र, नंतर तब्येतीच्या कुरबुरीमुळे तिने ही नोकरी सोडली आणि मनोरंजन विश्वात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.
मालिकांमधून केली करिअरची सुरुवात
दीपिकाने मनोरंजन विश्वात प्रवेश केला, त्यावेळी तिचे लग्न झाले होते. दीपिका कक्करचे पहिले लग्न रौनक सॅमसनशी झाले होते, जो पायलट होता. मात्र, प्रेमविवाह असूनही हे नाते फार काळ टिकले नाही. दीपिकाने सुरुवातीला अनेक मालिकांमध्ये छोट्या भूमिका केल्या. तिने 2010 मध्ये 'नीर भरे तेरे नैना देवी' मधून आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात केली. यानंतर ती 'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो'मध्येही झळकली. मात्र, 2011मध्ये सुरु झालेल्या ‘ससुराल सिमर का’ या मालिकेने तिचे नशीब पालटले. या मालिकेत तिने ‘सिमर’ ही मुख्य भूमिका साकारली होती. दीपिकाने ‘बिग बॉस’ या शोचे विजेतेपदही पटकावले आहे.