एक्स्प्लोर
कॉमेडी किंग कपिल शर्मा बोहल्यावर!
पंजाबी विधीनुसार कपिल आणि गिन्नीचा विवाह पार पडला. जालंधरमध्ये कपिलचं घर आहे.
जालंधर : कॉमेडी किंग कपिल शर्मा विवाहबंधनात अडकला आहे. पंजाबच्या जालंधरमधील एका शानदार सोहळ्यात कपिलने काल (13 डिसेंबर) गर्लफ्रेण्ड गिन्नी चतरथसोबत लगीनगाठ बांधली. लग्नात कपिल आणि गिन्नीच्या कुटुंबीयांसह मित्रमंडळी उपस्थित होते. यानंतर बॉलिवूडसह छोट्या पडद्यावरील सेलिब्रिटींसाठी मुंबईत रिसेप्शनचं आयोजन करण्यात येणार आहे.
पंजाबी विधीनुसार कपिल आणि गिन्नीचा विवाह पार पडला. जालंधरमध्ये कपिलचं घर आहे. त्यामुळे त्याने तिथेच लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाचा सोहळा 10 डिसेंबरपासून सुरु झाला होता. गिन्नीच्या घरी मेहंदी आणि संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कपिल शर्मा डिसेंबरमध्ये गर्लफ्रेण्डसोबत विवाहबंधनात
कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांनी लग्नासाठी शाही लूकला पसंती दिली होती. कपिलने एमरल्ड ग्रीन रंगाची शेरवानी निवडली होती, ज्यावर सोनेरी कलाकुसर केली होती. शिवाय डोक्यावर पगडी आणि हातात तलवार असा त्याचा लूक होता. तर गिन्नीने पारंपरिक लाल रंगाच्या लेहंगा परिधान केला होता.
कपिलच्या होणाऱ्या सासऱ्यांनी शटअप म्हणत दिला होता लग्नाला नकार
गेलं वर्षभर कपिल शर्माने कठीण काळ पाहिला. कॉमेडी नाईट्स विथ कपिलमधील सहकलाकार सुनील ग्रोवरशी खटके उडाल्याने कपिल वादाच्या भोवऱ्यात अडकला. कपिलने अनेक वेळा शेवटच्या क्षणी शूटिंग रद्द केली होती. त्यामुळे अजय देवगन, शाहरुख खान, इम्रान हाश्मीसारख्या बड्या कलाकारांना ताटकळत राहावं लागलं होतं. त्यानंतर सोनी वाहिनीवर 'द कपिल शर्मा शो'लाही नारळ देण्यात आला. कपिलची प्रकृती बिघडल्यामुळे 'फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा' हा नवा शोसुद्धा अवघ्या तीन एपिसोडमध्ये गुंडाळण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement