एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Live Updates : मरी आई पावली! सगळ्यांच्या बुक्कीत टेंगुळ, सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस' विजेता

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Live Updates : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची ट्रॉफी कोण उचलणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

LIVE

Key Events
Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Live Updates :  मरी आई पावली! सगळ्यांच्या बुक्कीत टेंगुळ, सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस' विजेता

Background

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Live Updates :   जवळपास दोन वर्षांनंतर बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi New Season) हा खेळ रंगला होता. 28 जुलै 2024 रोजी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला सुरुवात झाली. पहिल्याच प्रोमोमध्ये रितेश भाऊंची एन्ट्री प्रेक्षकांना मोठा आश्चर्याचा धक्का देऊन गेली. त्यानंतर या घरात एकूण 16 स्पर्धक दाखल झाले होते. त्यानंतर आता केवळ सहाच स्पर्धकांनी ग्रँड फिनालेचा टप्पा सर केला आहे. त्यामुळे आता या सहा जणांपैकी कोण ट्रॉफी उचलणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

निक्की तांबोळी, अभिजीत जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि अंकिता वालावकर हे स्पर्धक बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेचे स्पर्धक आहे. त्यामुळे यांच्यापैकी ट्रॉफी कोण उचलणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागून राहिली आहे. 

बिग बॉसच्या घरातील स्पर्धक

योगिता चव्हाण, निखिल दामले, पुरुषोत्तम दादा पाटील, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोव्हा, वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, धनंजय दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, पंढरीनाथ कांबळे आणि जान्हवी किल्लेकर या 16 स्पर्धकांनी घरात प्रवेश केला होता. त्यानंतर एक एक करुन घरातील 10 स्पर्धकांनी घराचा निरोप घेतला. त्यानंतर संग्राम चौघुले याने घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री केली. पण वैद्यकीय कारणामुळे संग्रामला घराबाहेर जावं लागलं होतं. 

आर्याला बिग बॉसच्या घरातून काढलं 

दरम्यान आर्या जाधवला बिग बॉसच्या घरातून काढून टाकण्यात आलं होतं. कारण आर्याने बिग बॉसच्या घरात हात उगारत बिग बॉसच्या मूलभूत नियमांचं उल्लंघन केलं होतं. बिग बॉसच्या घरात हिंसा न करणं हा मूलभूत नियम आहे. पण याच नियमांचं आर्याने उल्लंघन करत निक्कीला कानशिलात लगावली होती. त्यानंतर आर्यावर कारवाई करत तिला बिग बॉसच्या घरातून हकलण्यात आलं होतं. 

13:02 PM (IST)  •  07 Oct 2024

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचं नेटकरी करतायत कौतुक

Big Boss Marathi:  बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची सांगता दणक्यात झाली असून गेल्या 70 दिवसांपासून बिग बॉसच्या घरात रंगलेला खेळ संपला आहे. बिगबॉसच्या घरात ७० दिवस राहून परत आल्यावर टॉप ६ सदस्यांचं घरी जंगी स्वागत होतंय. जान्हवी किल्लेकर हिच्या घरच्यांनी केलेल्या तिच्या स्वागताचा व्हिडिओ आता चांगलाच गाजतोय. घरी परतल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी ढोल ताशाच्या गजरात तिचं स्वागत केलं. यावेळी जान्हवीनंही ठेका धरला होता.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

13:01 PM (IST)  •  07 Oct 2024

Bigg Boss Marathi : सूरज चव्हाण बिग बॉस विनर ठरल्यानंतर मिताली मयेकर नाराज?

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या धमाकेदार सीझनचा समारोप झाला आहे. रिल्स स्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता बनला आहे. सूरजच्या विजयानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणींनी सूरज चव्हाणचं कौतुक आणि अभिनंदन केलं आहे. तर, याउलट सोशल मीडियावर एक दुसरा वर्ग आहे, जो सूरजच्या विजयाला विरोध करत आहे. यातच आता बिग बॉस मराठी 5 मध्ये सूरज चव्हाण जिंकल्यावर अभिनेत्री मिताली मयेकर नाराज असल्याची चर्चा आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

13:00 PM (IST)  •  07 Oct 2024

Prajkta Mali Congratulate Suraj Chavan : अभिनेत्री प्राजक्ता माळीची सूरज चव्हाणसाठी खास पोस्ट

Prajkta Mali Congratulate Suraj Chavan : अभिनेत्री प्राजक्ता माळीने सूरज चव्हाणचं अभिनंजन करत खास पोस्ट केली आहे. यामध्ये तिने लिहिलंय, 'खूप खूप अभिनंदन सूरज तुझ्यातला प्रामाणिकपणा आणि जिद्द बिग बॉसच्या घरात तुला भेटल्यावर अगदी स्पष्टपणे जाणवली होती. कदाचित तुझा हाच स्वभाव महाराष्ट्राला भावला. महाराष्ट्राच्या मनात तू स्थान मिळवण्यात यशस्वी ठरलास आणि बिग बॉस मराठी च्या ट्रॉफीवर नाव कोरलस! पुन्हा एकदा खूप खूप, तुझ्या भाषेत झापुक झुपुक अभिनंदन!'

View this post on Instagram
 
A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

12:56 PM (IST)  •  07 Oct 2024

Happy Birthday Abhijeet Sawant : बिग बॉस मराठीचा 'जेंटलमन' अभिजीत सावंत कोट्यवधींचा मालक

Bigg Boss Marathi 5 Abhijeet Sawant : गायक अभिजीत सावंत याचा आज 7 ऑक्टोबर रोजी 43 वा वाढदिवस आहे. अभिजीत सावंत बिग बॉस मराठी सीझन 8 चा उपविजेता ठरला आहे. 'इंडियन आयडॉल 1' चा पहिला गायक अभिजीत सावंत शो जिंकल्यानंतर बरेच दिवस प्रसिद्धीपासून दूर होता. यानंतर तो बिग बॉसमधून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकला. अभिजीत सावंतला प्रेक्षकांचा भरभरुन पाठिंबा मिळाल्याचा पाहायला मिळालं. अभिजीतचा इथंपर्यंत पोहोचण्याचा प्रवास फार खडतर आहे. अभिजीत सावंतच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीबाबत जाणून घ्या.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

21:02 PM (IST)  •  06 Oct 2024

Bigg Boss Marathi Season 5  Winner : मरी आई पावली! सगळ्यांच्या बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस' विजेता

Bigg Boss Marathi Season 5  Winner :  बिग बॉस मराठी सीझन 5च्या (Bigg Boss Marathi New Season) विनर ट्रॉफीवर सूरजने (Suraj Chavan) आपलं नाव कोरलं आहे. पहिल्या आठवड्यापासूनच घरातील त्याचं वागणं, बोलणं या सगळ्याचच घरातील आणि घराबाहेरही चर्चा होत होती. अगदी शांतपणे सूरज त्याचा खेळ साऱ्यांच्याच पसंतीस पडला. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर सूरजने नावं कोरलं आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवालSunil Raut on Vidhan Sabha : घरी वेळ दिला,थोडा आराम केला...मतदानानंतर सुनील राऊत निवांत!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget