Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरातील वातावरण होणार भावुक... सदस्यांना भेटायला येणार त्यांचे कुटुंबीय
Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सदस्यांना भेटायला त्यांच्या कुटुंबातील सदस्य येणार आहेत.
Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सदस्यांना भेटायला त्यांच्या कुटुंबातील सदस्य येणार आहेत. जवळपास 65 दिवसाहून अधिक कालावधीनंतर आपल्या परिवारातील सदस्यांना स्पर्धक भेटणार आहेत. त्यामुळे घरातील सदस्य नक्कीच भावुक होणार आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये विकासला भेटण्यासाठी त्याची बायको घरामध्ये आली आहे. तर जयला भेटायला त्याचे आई वडिल आले आहेत.
या भेटीसाठी देखील सदस्यांना बिग बॉस एक टास्क देणार आहे असे दिसते आहे. ज्यामध्ये सदस्यांना किती वेळ द्यावा याचा निर्णय घरातील सदस्य ठरवणार आहेत. जास्तीत जास्त वेळ आपल्याला का देण्यात यावा याचे कारण घरातील इतर सदस्यांना सांगायचे आहे. त्यावर मीरा विकासला मनवण्याचा प्रयत्न करते आहे. मीरा विकासला सांगताना दिसणार आहे, खरंच मला खूप गरज आहे कारण ते बोलतसुध्दा नाही माझ्याशी तर या कारणामुळे बोलायला तरी लागतील.
View this post on Instagram
काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार पडले 'नॉक आऊट' हे नॉमिनेशन कार्य. या टास्कमध्ये सोनाली, विकास, गायत्री, मीनल घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिवसागणिक सदस्यांमधील नाती बदलत आहेत. जे सदस्य अगदी जिवाभावाचे मित्र वा जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या त्यांच्यामध्ये दुरावा येत चालला आहे. मागील आठवड्यात विशाल आणि विकास, तसेच गायत्री आणि मीरामध्ये जोरदार भांडण झाले. त्यामुळे त्यांनी एकमेकांशी बोलणे सोडले. तसेच विशाल आणि सोनालीमध्ये देखील अबोला तसाच आहे.
संबंधित बातम्या
Salman Khan : 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' नंतर भाईजानचा 'Tiger 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Ram Charan Acharya Teaser : 'आचार्य' सिनेमाचा टीझर प्रदर्शित, 24 तासांत मिळाले 'इतके' व्ह्यूज
जीवे मारण्याच्या धमकीनंतर कंगना म्हणते, सोनियाजी, तुम्हीही एक महिला, इंदिरा गांधीही दहशतवादाविरुद्ध लढल्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha